एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंच्या हातात एकनाथ शिंदेंची खुर्ची, शिंदे पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात?

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आजही पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात असल्याचे कायदेतंज्ञांचे म्हणणे असल्याने 11 जुलै अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. काल सायंकाळी विधानभवनात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे आजही पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात असल्याचे कायदेतंज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे केवळ अकरा दिवसांचे मुख्यमंत्री तर ठरणार नाही ना अशा चर्चाना सोशल मीडियात उधाण आले आहे. 

राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. भाजप आणि शिंदे गटाच्या साहाय्याने राज्यात नाव सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये सुरवातीला नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार या घोषणेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र आता देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पद का घेतले नाही, एकनाथ शिंदे यांना का पुढे केले? असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मात्र अद्यापही शिवसेनेच्या व्हीप बाबत प्रश्न तसाच आहे. येत्या ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी आहे. म्हणजे व्हीप काढण्याचा अधिकार अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा खटला प्रलंबित आहे. हाच शिंदे यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. कारण शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्यामते सभागृहाबाहेर पक्षविरोधी कारवाई केली तरीही लोकप्रतिनिधी अपात्र ठरू शकतात. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मात्र त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी आमदारांना मतदान करावे लागेल. त्यावेळेस पक्षप्रमुखांकाकडून व्हीप काढला जाईल. या संदर्भात जर शिवसेनेला व्हीप काढला की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे विरोधात मतदान करायचे किंवा मतदान करायचे नाही असे झाले तर आज जे कोणी बंडखोर आमदार असो व शिवसेनेचे सदस्य असो त्यांना त्या व्हिपचे पालन करावे लागणार आहे.

कायदेतज्ञ काय सांगतात?
पक्षांतर बंदी कायदा तर त्याच्याखाली कोणी जर का पक्ष सोडला आणि या 16 लोकांनी पक्ष सोडला असं शिवसेनेचे म्हणणं आहे तर ते डिश क्वालिफाय होतात.  त्याच्यावरचा निर्णय लागायचा आहे. परंतु बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे की आता जे गट बाहेर पडला तो अपात्र झालेला नाही. सध्या पक्षाने विलीनीकरण केलेनासून शिंदे गटाने विलीनीकरण करणायचा प्रयत्न केला आहे. आता ते शिवसेना असल्यामुळे त्यांना कायद्याचं अस्तित्व नाही आहे आणि शिवाय ते दोन तृतीयांश आहेत असं जरी धरलं तरी तो पक्ष म्हणून डिक्लेअर करण्याचा अधिकार स्पीकरचा आहे का इलेक्शन कमिशनचा आहे याबद्दलही सध्या गोंधळ सुरु आहे. यासाठी हे प्रकरण कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे म्हणजे पाच जेजेसच्या बेंचकडे देण्यात यावे. जेणेकरून त्यांच्या अहवालानंतर सगळं समोर येईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

उद्धव ठाकरेंवर निर्णय 
सध्या व्हीप बजावण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ठरविले तर हा विषय सर्वोच्च न्यायालयात पुढे सुरु राहू शकतो. आणि पुढे बंडखोर आमदारांचा विषय सतत सुरु राहील. आणि त्यात हे आमदार अपात्रही ठरू शकतात. शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन झालेला नसल्याने ते सध्या शिवसेनेतच आहेत. त्यामुळे कायद्यानुसार पक्षप्रमुखालाच गट नेता किंवा प्रदोत  नियुक्त करण्याचा अधिकार असतो. नियुक्त केलेल्या घटनेतला व्हीप काढण्याचा अधिकार असतो. त्यामुळे यावर शिवसेना काय करते हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात हातात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे. त्यामुळे ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Embed widget