Sharad Pawar In Nashik : 'उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत', शरद पवार यांचे सूचक वक्तव्य
Sharad Pawar In Nashik : उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक (Nashik) येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Sharad Pawar In Nashik : मध्यावधी निवडणुका (Election) होतील अशा चर्चेला उधाण आले असताना उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार आहोत असे सांगतानाच निवडणुका होणार नसतील तरी राज्य एकंदर कोणत्या परिस्थितीत चाललं आहे त्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. काही कमतरता आणि चुका असतील त्यासंबंधीची भूमिका त्या-त्या वेळी घेतली जाईल त्यामुळे आम्ही बांधलेली राजकीय बांधणी अजिबात विस्कळीत होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे येथे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांनिमित्त नाशिकमार्गे जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी नाशिकमध्ये (Nashik) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भेट घेतली. तसेच आज शरद पवार हे नाशिक मुक्कामी आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकार टीका करताना म्हणाले की राज्यात सरकार येऊन एक महिना झाला असून अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूर परिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते लोक संकटात आहे. तिकडे भेटी देता यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा. स्वतःच कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधा भास तुम्हीच बघा असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ज्या परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, लोक संकटात आहेत अशा ठिकाणी दौरे करत आहेत. स्वागतासाठी, सत्कारासाठी विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे नाहीत. यातून कोणी काय बोध घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय हाती आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. परंतु प्रथमदर्शनी वाचनानंतर परिस्थिती चिंताजनक आहे. ओबीसी हा मोठा वर्ग या संबंध सत्तेच्या आणि प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली.
आगामी निवडणुकांसंबंधीचे स्पष्ट चित्र समोर येण्याची गरज आहे. आमची इच्छा आहे की सहकारी पक्षांशी एकत्रित लढण्याच्या मुद्द्यावर चर्चा करावी, चर्चा करून एकत्रित लढण्याचा निर्णय झाला तर चांगले होईल, असेही शरद पवार म्हणाले. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अजूनही खातेवाटप होत नाही, असा प्रश्न माध्यमांकडून विचारला असता, नव्या सरकारचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ते काम समर्थपणे चालवू शकतील असा आत्मविश्वास आहे, त्यामुळे काम चालू आहे, असा टोलाही शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे. या निर्णयाविरोधात आम्ही रिव्ह्यू पिटिशन टाकू असे मला सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टात भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि वकील मनवेंद्र सिंह नव्हते. त्यामुळे रिव्ह्यू पिटीशनच्यावेळी त्यांनाही घेऊन जा, अशी मागणी आम्ही केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब योग्य ना
की राज्यात सरकार येऊन एक महिना झाला असून अद्यापही राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूर परिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ टीम असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचे नेते लोक संकटात आहे. तिकडे भेटी देता यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा. स्वतःच कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधा भास तुम्हीच बघा असे शरद पवार यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
