Nashik NMC Election : नाशिक महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर 'ईमेलद्वारे' हरकती, आतापर्यत 15 हरकती प्राप्त
Nashik NMC Election : नाशिक (Nashik) महापालिका निवडणूक (Nashik Mahapalika Election) आरक्षण सोडतीनंतर (OBC Reservation) आता त्यावर हरकती नोंदविण्याचे काम सुरु आहे.
Nashik NMC Election : नाशिक (Nashik) महापालिका निवडणूक (Nashik Mahapalika Election) आरक्षण सोडतीनंतर (OBC Reservation) आता त्यावर हरकती नोंदविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत आरक्षणावर 15 हरकती प्राप्त झाल्या असून 05 ऑगस्ट पर्यंत हरकती पाठविता येणार आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवसांपर्यंत हरकतीचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नाशिक महापालिका (Nashik NMC) निवडणूक प्रक्रियेतील प्रभाग रचना, मतदार यादी, आरक्षण सोडत हे टप्पे पार पडले असून आता निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत उमेदवारांसह प्रशासन आहे. तत्पूर्वी निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर ओबीसी आरक्षण मंजूर झाल्याने महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासहित सोडत काढण्यात आली.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या (State Election Commmission) सूचनेनुसार शुक्रवारी 29 जुलै रोजी नाशिक महापालिकेने ओबीसी आरक्षणाच्या 35 जागांसह महिला आरक्षणाची सोडत जाहीर केली होती. त्याच्यावर आजपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. विविध माध्यमातून महापालिकेला एकूण 15 हरकती प्राप्त झाल्या असून 5 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. ओबीसी आरक्षणचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर नाशिक महापालिकेत महिला आरक्षणाची सोडत देखील नव्याने काढण्यात आली. यामुळे त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्यामुळे एकूण 15 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
दरम्यान आतापर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींचा निपटारा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम सुरू केले असून 5 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान महिला आरक्षण नव्याने सोडत झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. त्याप्रमाणे काहींसाठी सेफ झोन देखील तयार झाला आहे. काही तक्रारदारांनी ई-मेलच्या माध्यमातून तर काहींनी प्रत्यक्ष महापालिकेत अर्ज सादर करून हरकती घेतल्या आहे. ज्या हरकतीमध्ये तथ्य असेल त्यांचा विचार होणार आहे, मात्र ज्याच्यात काही तथ्य नसेल ते फेटाळण्यात येण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत
एकीकडे नाशिक महापालिका निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे पार पडले असताना आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा प्रशासनासह इच्छुक उमेदवारांना लागली आहे.