Nitesh Rane Nashik : संजय राऊतला लीलावतीला पाठविण्याची वेळ आलीय, नितेश राणे यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद
Nitesh Rane Nashik : संजय राऊतला (Sanjay Raut) लीलावतीला पाठविण्याची वेळ आली असल्याचे खोचक वक्तव्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषदेत केले आहे.
Nitesh Rane Nashik : हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे, उद्धव ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतो असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. तसेच शरद पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली, मग हे का सापडत नाही, हिंदू संघटनांनी संयम सोडला तर बोलू नका, संबंधितांवर कारवाई झाली नाही तर आमचा संयम सुटेल या कडक शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात हिंदू देवदेवतांची विटंबना केल्या प्रकरणी आज नाशिकमध्ये नितेश राणे पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी ते बोलत होते. राज्यभरात हिंदूच्या देवांची अशा प्रकारे विटंबना केली जात आहे. याला आवर घालणे आवश्यक आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नाही. बाळासाहेबांचा मुलगा हे कस सहन करू शकतो. हिंदू देवदेवतांची विटंबना करण्याची, सोशल मीडियावर पोस्ट करण्याची या लोकांना अशा प्रकारे पोस्ट करण्याची सूट दिलीय का? या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या नंतर जर कायदा सूव्यवस्था बिघडली तर आम्ही जबाबदार राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान याच संदर्भात बोलतांना नितेश राणे म्हणाले कि, पवारांवर कविता लिहिली तिला आत टाकली मग हे गुन्हेगार का सापडत नाही. या प्रकरणी पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. पोलिसांनी खरी मर्दानगी आता दाखवावी. नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. मागील २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे सिंघम सारखं सगळीकडे कारवाईसाठी जाणारे नाशिक पोलीस आता काय करत आहे? असा सवाल त्यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केला.
कडवट शिवसैनिक संजय पवार
शिवसेनेवर टीका करताना त्यांनी राज्यसभेचे उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय पवार यांचे कोडकौतुक केले. शिवसेनेच्या कट्टर समर्थक हा संजय पवार असून संजय राऊत नाही. संजय राऊत बाहेरून आला आहे. संजय राऊत निर्लज्ज असून त्याने मासाहेब आणि बाळासाहेब यांच्यात वाद असल्याचा लेख लिहिला होता. अशा संजय राऊतला शिवसेनेचे आमदार मत देतीला का? उलट सेफ मत संजय पवार याला द्यावी, राऊतला उर्वरित मत द्यावी. संजय राऊत ला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे. असे सूचक विधान देखील नितेश राणे यावेळी केले.
काँग्रेस - राष्ट्रवादीची उद्धव ठाकरेना भीती
नितेश राणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना काँग्रेस राष्ट्रवादीची भीती वाटते. ते औषध देखील त्यांना विचारल्या शिवाय घेऊ शकत नाही, ते काय औरंगाबाद नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना लपवून ठेवावी लागते ही वेळ आली असून एके काळी शिवसेनेच्या धाकाने इतर पक्षाचे आमदार पळायचे आता यांचे आमदार पळत आहे, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा
सोशल मीडियावर शिवलिंग विटंबना प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा भाजपचा आरोप केला. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप पण हा मोर्चा काढला. नितेश राणे यांच्यासह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते. सोबतच काही अन्य हिंदुत्ववादी संघटना सुद्धा मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान नाशिकच्या बी डी भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.