Nashik Leopard : तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याच्या सुटकेचा थरार, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहराजवळ मोहाडी (Mohadi Shiwar) शिवारात तारेच्या संरक्षण कुंपणात अडकलेल्या बिबट्याची (leopard) वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) करत सुखरुप सुटका केली.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) आणि बिबट्या (Leopard) हा प्रश्न दिवसेंदिवस अगदी जवळचा होत चालला आहे. कधी घरात, कधी शेतात तर कधी गॅलरीत कुठेही बिबट्या दृष्टीस पड्तो. मात्र दृष्टीस पडलेल्या बिबट्याला पाहून अनेकांची भीतीने गाळण होते. असा बिबट्या नाशिक शहराजवळील मोहाडी (Mohadi Shiwar) शिवारातील तारेच्या संरक्षण कुंपणात अडकल्याची घटना घडली. या बिबट्याची वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Operation) करत सुखरुप सुटका केली.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्याच्या तसेच दर्शनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरररोज बिबट्याच्या संदर्भातील बातम्या टीव्हीवर झळकताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात हरेक दिवशी बिबट्या आणि नाशिककर आमनेसामने येत असल्याने नाशिक हे बिबट्याचा अधिवासाचा जाणून केंद्रच बनले आहे. दरम्यान नाशिकच्या ओझर जवळील मोहाडी शिवारात तारेच्या कुंपणात बिबट्या अडकून असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागणारे तातडीने रेस्क्यू टीमला पाचारण करत संबंधित बिबट्याला डार्टद्वारे बेशुद्ध करून तारेच्या कुंपणातून बाहेर काढले आहे.
ओझर शिवारात (Ojhar) मोहाडी व साकोरे या गावच्या हद्दीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) कंपाऊंड वॉलला तारेचे कुंपण करण्यात आले आहे. या कंपाउंड वॉल ला एका ठिकाणी भगदाड पडले असल्याने येथील काही नागरिकांनी शिकारीसाठी तारेचे कुंपण घातले होते. या भगदाडातून जात असलेला बिबट्या मात्र, कुंपणात अडकला. ही घटना समजताच परिसरातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही बाब वनविभागाला कळविण्यात आली. यावेळी चांदवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे, दिंडोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जोशी, वनपाल डी टी चौधरी, वनपाल अशोक काळे, वनपाल देवरे, यांच्यसह पथक घटनास्थळी पोहचले.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावर परिस्थितीची पाहणी करून ओझर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ तोरणपवार यांचा वैद्यकीय सल्ला घेतला. त्याचप्रमाणे वन संरक्षक पंकज गर्ग, मनमाडचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक विवेक भदाणे यांनी यशस्वीरीत्या डार्ट करून बिबट्याला बेशुद्ध करत सुरक्षित रित्या पिंजऱ्यामध्ये वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आले.
नाशिक बिबट्याचे माहेरघर
बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी बोरगड परिसरात बिबट्याचा हल्ल्याची घटना घडली होती. लहवीत येथे पात्र तोडून बिबट्या घरात कोसळला होता. या सारख्या घटनांनी बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. त्यामुळे शहर परिसरात वाढत असलेला मानव बिबट संघर्षात नागरिकांनी देखील सजग असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.