Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवले जाणार, छगन भुजबळांची माहिती
Nashik Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील (Nashik Mumbai Highway) सर्व खड्डे आठ दिवसांच्या आत पूर्णपणे बुजवले जातील अशी माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना दिली.
Nashik Mumbai Highway : मुंबई-नाशिक महामार्गाची (Mumbai Nashik Highway) खड्ड्यांमुळे दुरावस्ता झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी आज नाशिक (Nashik) येथील कार्यालयात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (Highway) प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक मुंबई महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना दिली.
येवला मतदारसंघातील (Yeola Assembley) जलसंधारणांच्या कामाबाबत आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी छगन भुजबळ यांनी येवला मतदार संघातील कोटा बंधारा महालखेडा, साठवण तलाव सावरगाव, साठवण तलाव ममदापूर (मेळाचा बंधारा), साठवण तलाव देवना,प्रस्तावित साठवण तलाव राजापूर (वडपाडी) साठवण तलाव जायदरे (आडनदी) या प्रकल्पासह बंधारे दुरुस्ती व प्रस्तावित दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. कोटा बंधारा महालखेडा या बंधाऱ्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर पूर्वी या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
येवला मतदार संघातील कोटा बंधारा महालखेडा, साठवण तलाव सावरगाव, साठवण तलाव ममदापूर (मेळाचा बंधारा), साठवण तलाव देवना त्याचबरोबर प्रस्तावित साठवण तलाव राजापूर (वडपाडी) व साठवण तलाव जायदरे (आडनदी) या प्रकल्पासह बंधारे दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच निफाड तालुक्यातील साठवण तलाव सावरगाव या प्रकल्पासाठी 11कोटी 80 लक्ष रुपये निधी प्राप्त असून या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सहा महिन्यात या प्रकल्पासाठी पुन्हा सुप्रमा घेऊन डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी सदरच्या कामात दिरंगाई न होता हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
साठवण तलाव ममदापुर बंधारा या बंधाऱ्यासाठी 6 कोटी 45 लक्ष रुपये निधी प्राप्त असून वनविभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या नागपूर कार्यालयात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या फेज वनला महिनाभरात मंजुरी मिळून प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. तसेच साठवण तलाव देवना या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून प्रकल्पाच्या निवदेस परवानगी देण्याबाबत छगन भुजबळ यांनी जलसंधारण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत निविदा मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
येवला तालुक्यातील प्रस्तावित साठवण तलाव राजापूर वडपाटी व साठवण तलाव जायदरे या प्रकल्पाच्या पाणी उपलब्धता प्रस्तावातील त्रुटी दुरुस्ती करून प्रस्ताव आठवडाभरात जलसंपदा विभागाकडे दाखल करण्यात याव्यात. त्याचबरोबर मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांचे प्रस्ताव आठवडाभरात शासनाला सादर करावे अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खड्डे आठ दिवसात बुजवले जाणार
मुंबई नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे दुरावस्ता झाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्प संचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक मुंबई महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना दिली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, एनएचआयचे प्रकल्प संचालक बी.एस.साळुंखे आदी उपस्थित होते.