Nashik Crime : सहा हुक्का पार्लरवर कारवाई, नाशिक पोलीस 'इन अॅक्शन'
Nashik Crime : नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) सहा हुक्का पार्लरवर (Hukkah Parlor) कारवाई केली असून यामध्ये १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) अवैध व्यवसायांना उत आला आहे. या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कंबर कसली असून दोन दिवसांत सहा ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hukkah Parlor) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिक शहरात खून, घरफोडी, मारहाण, चेन स्नचिंग आदी घटना सर्रास घडताना दिसत आहेत. त्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री आदी प्रकार शहरातील बड्या हॉटेल्समध्ये रोजरोसपणे होत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सरसावले आहेत.
नाशिक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस ठाणे (Gangapur Police Station) हद्दीतील सहा हॉटेल्सवर रात्रीच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये हुक्का पार्लर मालक तथा हुक्का पिणाऱ्या 14 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर ठिकाणाहून तब्बल 64 हजार 390 रुपयांसह अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट 01 व 02 च्या पथकाने केली.
या हॉटेल्सवर छापा
हॉटेल कोबल स्ट्रीट (सुला वाइन रोड), हॉटेल बारको (सुला वाईन रोड), हॉटेल एअरबार (कॉलेज रोड), डेटा मॅटिक्स इमारतीच्या तळमजल्यावरील गाळयात, हॉटेल शांती इन (इंदिरा नगर), हॉटेल तात्याबा ढाबा (गौळाणे रोड), या हॉटेल्सवर छापा टाकून कारवाई करण्यात आली.
नाशिकची वाढती गुन्हेगारी
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे. मागील वर्षभरापासून नाशिक पोलिसांनी अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी आखडता हात घेतल्याचे दिसून येते. शहरात कुठेही सर्रास मद्यप्राशन, हाणामारी, अनेक ठिकाणी होणारी अमली पदार्थांची खुलेआम विक्री याकडे नाशिक पोलिसांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने सातत्याने कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
