Nashik Lightning Strikes : चारा घेऊन जाणाऱ्या महिलेचा वीज कोसळून मृत्यू, नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील घटना
Nashik Lightning Strikes : नाशिक (Nashik) तालुक्यातील संसरी येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविता बाळासाहेब गोडसे (45) असे या महिलेचे नाव आहे.
Nashik Lightning Strikes : नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले तर नाशिक तालुक्यातील संसरी येथे वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविता बाळासाहेब गोडसे (45) असे या महिलेचे नाव आहे.
नाशिकसह परिसरात काल सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. हंगामातील या पहिल्याच पावसाने व्यवसायिक आणि नागरिकांची धावपळ उडाली. नाशिक शहरासह जिल्ह्यातील चांदवड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांचे शेड, झाडे, विद्युत खांब कोसळल्याने अनेक वाहनांसह विविध वास्तू-वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान कुठे झाड कोसळून तर कुठे पत्रा लागून अनेक जण गँभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली.
तर नाशिक शहरातील संसारी येथे महिलेवर वीज कोसळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सदर महिला जनावरांना चारा घेऊन मळ्यातून घरी परतत असताना वीज अंगावर पडली. यावेळी महिलेच्या पाठीमागे काही अंतरावर असलेली मुलगी यातून बाल बाल बचावली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी सदर महिलेस कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी महिलेस मृत घोषित केले.
गेल्या दोन चार दिवसापासून शहरासह जिल्ह्यात उन्ह वाढले होते. त्यातच सोमवारी देओल तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मांसम्द शहराला पावसाने झोडपून काढले. तर काल नाशिक शहरासह चांदवड तालुक्यात वादळी पावसाने सामी दिली. दुपारपासूनच वातावरणात बदल झाल्याचे जाणवले होते. अशातच सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमाने, भाजीविक्रेते यांना धावपळ करावी लागली. .
दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने काल जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीटही झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी, देवळा, निफाड, सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
मंदिरावर वीज कोसळली
सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री पाटपिंप्री येथील ग्रामदैवत मारूती मंदिरावर वीज पडल्याने ग्रामस्थांची धांदल उडाली. यामुळे मंदिराच्या कळसाला मोठा तडा गेला आहे. तर त्र्यंबकेश्वर शहरात पावसाने हजेरी लावली. यावेळी गंगाद्वार परिसरात वीज कोसळल्याची घटना घडल्याने दगड निखळल्याचे स्थानिकांनी सांगितले.