एक्स्प्लोर

ATS Raid Nashik : मालेगावमधून पुन्हा दोन PFI च्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

ATS Raid Nashik : नाशिकच्या (Nashik) मालेगाव (Malegaon) येथून देखील पुन्हा दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

ATS Raid Nashik : पाच दिवसांपूर्वी देशभरात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) व एटीएस (ATS) कडून पीएफआयच्या (PFI) कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. यामध्ये पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad), बीड, कोल्हापूर (Kolhapur) आदी जिल्ह्यातून हे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले होते. आज पुन्हा देशभरातील महत्वाच्या शहरात धाडी टाकून पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे. नाशिकच्या (Nashik) मालेगाव येथून देखील पुन्हा दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

राष्ट्रीय तपास संस्था तसेच एटीएसच्या माध्यमातून पाच दिवसांपूर्वी पॉप्युलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर (PFI) देशभरात छापेमारी सुरू केली आहे. राज्यात पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह (Aurangabad) इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मालेगाव (Malegaon) येथून देखील एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था पुन्हा एकदा छापेमारी करत असून आज सकाळपासून राज्यातील महत्वाच्या शहरांत हे धाडसत्र सुरु केले आहे. 

दरम्यान आज पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव येथून दोघा संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. पीएफआय संघटनेशी संबंधित दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 151 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले असल्याचे समजते आहे. पीएफआयचे माजी अध्यक्ष मोहम्मद इरफान दौलत नदवी, रशीद शहदैन शहीद इकबाल असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. 

त्यानंतर संशयितांना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अटक करण्यात आलेल्या PFI च्या पाच सदस्यांना 03 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. PFI संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसे पुरविले, समाजात अशांतता पसरले असे कृत्य, कट रचणे आदी गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे संबंधित संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे .प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देणे व पत्रकार परिषद घेऊन मालेगावातून अटक करण्यात आलेल्या मौलाना सैफुर रहमानचे समर्थन करणे या मुद्द्यांखाली या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मालेगाव पुन्हा रडारवर आले आहे. 

नाशिकच्या जिल्हाध्यक्षाला अटक
राष्ट्रीय तपास संस्थेने सुरू झालेल्या कारवाईत नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगाव गाठत मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यास नाशिकच्या एटीएस कार्यालयात हजर करण्यात आले. याच बरोबर राज्यभरातून कोल्हापूर, बीड, उणे आदी शहरात ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना एटीएस कार्यालयात ठेवण्यात आले होते. नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच संशयितांना 03 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सैफुर रहेमान हा नाशिक जिल्हाध्यक्ष
आज पहाटे महाराष्ट्र एटीएसने मालेगाव येथे कारवाई केली. या कारवाईत सैफुर रहेमान यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
Embed widget