Trimbakeshwer Fog : अवघं त्र्यंबकेश्वर शहर धुक्यात हरवलं, निसर्गस्पर्शाची अनुभूती देणारा व्हिडीओ पाहिलात का?
Trimbakeshwer Fog : गुलाबी थंडी, पक्षांचा किलबिलाट, हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, अन त्यातही दाट धुक्यात हरवलेलं त्र्यंबकेश्वर शहर.
Trimbakeshwer Fogg : गुलाबी थंडी, दाट धुक्यात हरवलेलं शहर, पक्षांचा किलबिलाट, हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, त्यातून वाहणारा थंडगार वारा, असे गुलाबी वातावरण सध्या त्र्यंबकचा ब्रह्मगिरी पर्वत (Bramhgiri) बुडालाय. नाशिकपासून (Nashik) अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहर धुक्यात हरविल्याची चित्र आज अनुभवयाला मिळाले. सध्या या धुक्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
त्र्यंबक म्हटलं कि पावसाळा (Rainy) आणि हिवाळा (Winter) दोन्ही ऋतूत अगदी शहर खुलून निघते. काल झालेल्या अवकाळीनंतर आज पहाटेपासून शहरासह ब्रम्हगिरी पर्वत, अंजनेरी (Anjneri) डोंगर धुक्यात न्हाहून निघाल्याचे चित्र होते. एकीकडे अवकाळी पावसाने झोडपल्यानंतर कालपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवू लागला आहे. शिवाय बोचऱ्या थंडीतही (Cold) वाढ झाली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच नाशिक स्थरावर धुक्याची दुलई पांघरल्याचे चित्र होते. त्यामुळे शहर वासियांना धुक्याचा सुखद अनुभव मिळाला. दरम्यान सध्या ऊन पावसाच्या खेळात धुक दाटत असून त्र्यंबकेश्वर शहरात आज पहाटेच्या सुमारास अवघड शहर धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळालं.
दरम्यान सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरल्याने पंधरा-वीस फुटांवरील काही दिसत नव्हते. त्यामुळे सकाळच्या सुमारास निघालेले चाकरमाने, मॉर्निग वॉक करणारे यांना आल्हाददायक अनुभूती मिळाली. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांना दिवे सुरू ठेवावे लागले. बच्चे कंपनीला हा अनुभव नवा असल्याने, हे दृश्य पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता. आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास होत असल्याचे दृश्य पहायला मिळाले. निसर्गाचे हे अद्भूत रुप नागरिकांनी डोळ्यांत साठवण्यासारखे होते. दहा वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाल्यानंतर धुके विरले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर (Nashik trimbakeshwer) दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. वाहनचालकांना अगदी काही अंतरावरचेही स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी झाल्याचे चित्र होते. वाहनांचे दिवे लावून प्रवासाची परिस्थिती त्र्यंबक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही होती. पहाटे कामाला जाणारे कामगार अंगात स्वेटर आणि डोक्याला मफलर गुंडाळून जाताना दिसले. पहाटे व्यायाम किंवा फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. सूर्योदय झाल्यानंतरही काही काळ त्याचे दर्शन होऊ शकले नाही. शाळेत जाणाऱ्या बालचमूंनी धुक्याची चादर अंगावर घेऊन, उबदार कपड्यातून प्रवास केला. तर अनेक नागरिकांनी निलपर्वतावर जाऊन धुक्याची अनुभूती क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्यावाचून राहावलं नाही...