(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NCP : भुजबळांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी मैदानात, महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना सप्रेम भेट
Nashik NCP : भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या (NMC) शाळेत महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना सप्रेम भेट दिल्या आहेत.
Nashik NCP : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीका होत असतांना त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहे. राष्ट्रवादीच्या युवक कॉँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापलिकेच्या (NMC) शाळेत जात महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना सप्रेम भेट दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये (Nashik) भाजप पदाधिकाऱ्यांनी सरस्वतीची (Sarasvati) पूजा करत भुजबळांविरोधात आंदोलन केले आहे. त्यानंतर आज नाशिख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. नाशिक- सातपुर परिसरात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिमा भेट देत भुजबळांनी केलेल्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे.
छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भुजबळ यांच्यावर जहरी टीका होऊ लागल्याने राष्ट्रवादीने भुजबळ यांची बाजू लावून धरण्यासाठी एकप्रकारे महापुरुषांच्या प्रतिमा वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या सरस्वती आणि महापुरुषांचे फोटो या प्रकरणावरून थेट त्यांच्या भुजबळ फार्मवर भाजप निषेध आंदोलने करीत आहे. विविध संघटनांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात आंदोलनांची तयारी केली जात असतांना भुजबळांच्या समर्थनार्थ युवक राष्ट्रवादी सरसावली आहे.
नाशिक राष्ट्रवादीच्या युवक च्या माध्यमातून शहरातील मनपा शाळांना महापुरुषांचे फोटो सप्रेम भेट देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भाऊराव पाटील याचबरॊबर इतर महापुरुषांच्या प्रतिमा शाळांना भेट देत आहोत. जेणेकरून विद्यार्थ्यांवर महापुरुषांचे विचार, संस्कृती रुजली गेली पाहिजे. याच महापुरुषांमुळे आज शिक्षण घेत आहोत. त्यामुळे हे महापुरुष विद्यार्थ्यांनास समजले पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत नाशिक शहरात राबवला आहे. महापुरुषांनी केलेल्या कार्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये उतरावे याकरिता प्रतिमेचे वाटप करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
भुजबळ अस बोललेच नाही!
दरम्यान राष्ट्रवादीचे अंबादास खैरे म्हणाले कि, आम्ही त्या कार्यक्रम होतो, सरस्वती मातेचे फोटो काढा किंवा दुर्गामातेचे फोटो काढा? असे वक्तव्य भुजबळ यांनी कुठेही केले नाही. छगन भुजबळ म्हणाले कि, प्रथमतः या महापुरुषांचे फोटो लावले गेले पाहिजे. त्याच्यानंतर मग पूजा अर्चा झाली पाहिजे. मात्र छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास केला जात आहे. एकीकडे महागाई वाढते आहे, मात्र त्याविषयी कोणीच बोलत नाही. भाजपकडून रोज काही ना काही विरोध म्हणून आंदोलन केले जात असल्याचे खैरे म्हणाले.