एक्स्प्लोर

Nashik Graduate Constituency : शुभांगी पाटलांचं त्र्यंबक राजाला साकडं तर सत्यजीत तांबेचे विजयी बॅनरही झळकले! 

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरु आहे.

Nashik Graduate Constituency : एकीकडे नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे यांच्यात लढत सुरू आहे. अशातच शुभांगी पाटील या त्र्यंबकेश्वरला देव दर्शनासाठी गेल्या आहेत. तर इकडे सत्यजीत तांबे यांच्या विजयी अभिनंदनाचे बॅनरही झळकू लागले आहेत. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ  निवडणुकीच्या मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात 49.32 टक्के मतदान झाले असून याची मतमोजणी सय्यद पिंपरी येथील गोदामात 28 टेबलवर सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, या निवडणुकीत नेमका कुणाचा विजय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन त्रंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे शुभांगी पाटील यांनी त्रंबक राजाचे मनोभावे दर्शन घेऊन आपलाच विजय होण्याची प्रार्थना केली. तसेच त्यांच्या मातोश्री आणि काकू यांनी देखील त्र्यंबक राजाला विजयासाठी साकडे घातले.

तर दुसरीकडे सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली असून फ्लेक्सवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही फोटो पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरू असून अशातच निकालापूर्वीच संगमनेर शहरातही फ्लेक्स लागले आहे. सत्यजित तांबे यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात झाली आहे. 'आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन.. या आशयाचे अनेक फ्लेक्स संगमनेर शहरात लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातही विजयी अभिनंदनाचे पोस्टर झळकत आहेत. यात 'जीत सत्याची विजय नव्या पर्वाचा' असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरघोस मतानी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांचे हार्दिक अभिनंदन, असे पोस्टर पुण्यात लावण्यात आले आहे.

मतमोजणीला सुरुवात... 

दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून 28 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली असून एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होईल. या एका टेबलवर तीन अधिकारी उपस्थित राहतील. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल. तसेच सुरुवातीला 25-25 चे गठ्ठे तयार करण्यात येऊन ते एकमेकांत मिसळले जातील, सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. यातून वैध मते काढून मतमोजणाला सुरुवात होईल. या प्रक्रियेला सुमारे चार तास लागतील. नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सुरुवातीला मतमोजणीच्या वेळी वैध मतदानाच्या आधारावर कोटा काढण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget