NCP Political Crisis : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा
NCP Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics Crisis : अजित पवार यांनी आज भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजभवनावर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत बंड केला होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा निर्णय वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला असल्याचे सांगितले. अजित पवारांच्या या निर्णायाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का ? असा सवालही यामुळे उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्या बंडावर अद्याप शरद पवारांची कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही सांगितले. राज्याचे हित पाहून निर्णय घेतला आहे.
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती.तरुणांना संधी देणं गरजेचं. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. आपण कामाशी मतलब ठेवतो. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेऊ. हा निर्णय घेताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे, असे अजित पवार म्हणाले. .
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहेत. पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहोत. नागालँडला निवडणुका झाल्या, तिथे पक्ष भाजपबरोबर गेल्गेला आहे. काही जण आरोप करतील, साडे तीन वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. तेव्हा मविआनं काम केलं. आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजपबरोबर देखील जाऊ शकतो. पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
आज आम्ही एक निर्णय घेऊ, शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तशी आम्ही शपथ घेतली, विस्तार होणार आहे. इतर सहकारी मित्रांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. यासंदर्भात अनेक चर्चा सुरु होतील. वरीष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील ९ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी साहेब करतायत. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे. विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही, असे अजित पवार म्हणाले.