(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trimbakeshwer Jotirling : त्र्यंबकेश्वरला कुलू मनालीच्या धर्तीवर ई टॉयलेटसह भाविकांसाठी रॅम्प पूल
Trimbakeshwer Jotirling : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराच्या दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित इलेकट्रॉनिक इको टॉयलेटसह (Eco Toilet) दर्शनासाठी रॅम्प पूल (Ramp Pool) उभारण्यात आला आहे.
Trimbakeshwer Jotirling : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराच्या पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित इलेकट्रॉनिक इको टॉयलेटसह (Eco Toilet) दर्शनासाठी रॅम्प पूल (Ramp Pool) उभारण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळणार असून मंदिर प्रशासनाकडून यासुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakehwer Jotirling) देशभरात प्रसिद्ध आहे. कोरोनाची (Corona) दोन वर्ष उलटल्यानंतर त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी हजारी भाविक येत असल्याने गत काही महिन्यांपासून मंदिर परिसरात डागडुजीची कामे सुरु आहेत. दरम्यान देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या, कोणतीही अडचण त्यांना जाणवणार नाही, यासाठी मंदिर प्रशासन सर्वोतोपरी मदत करत आहे. त्र्यंबकेश्वेरी येणारा भाविकांना केंद्रस्थानी ठेवून मंदिर विश्वस्त मंडळ वेळोवेळी बैठकांच्या माध्यमातून सोयी सुविधा करण्यावर भर देत आहे.
दरम्यान जुलै महिन्यात सुसज्ज दर्शनबारीचे मंडपाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून एसी दर्शनबारी उभी करण्यात आली आहे. सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या दर्शनबारीस महत्वाच्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. त्यामध्ये आता स्वयंचलित ई टॉयलेट सुविधा कार्यन्वित करण्यात आली आहे. यातील टॉयलेट आणि युरिनल यांचे प्रत्येकी चार युनिट सेवेत रुजू झाले ऑन यामध्ये आणखी २२ युनिट्स ची भर पडणार आहे .
आतील व्यक्ती बाहेर आल्यानंतर संपूर्ण युनिट आपोआप स्वच्छ होणार असून हात पाय धुण्यासाठी स्वयंचलित नळ, सांडपाणी मैला विघटनसाठी अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली आहे.
तसेच प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात श्री नंदिकेश्वर मंदिर ते त्र्यंबकेश्वराचे मंदिर येथे जवळपास नऊ फुटाचा पूल रॅम्प टाकण्यात आला आहे. यामुळे भाविकांचा पायऱ्यांचा चढ उतार टळला आहे. दर्शनासाठी मोठी रांग लागत असते. तसेच भाविकांना दोन्ही मंदिराच्या 14 पायऱ्या चढउतार कराव्या लागत होत्या. पूर्व दरवाजा रांगेने येणारे भाविक नंदिकेश्वर मंदिरात येतात. त्यामुळे वृद्ध मंडळींसह भाविकांची टळली असून भाविकांची रांग पुढे सरकण्यास मदत होईल. त्यामुळे ट्रस्टमंडळांने पुरातत्त्व खात्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्याला यश आले आहे.
कुलूमनालीच्या धर्तीवर इ टॉयलेट
दरम्यान दर्शनबारी उभारल्यानंतर येथील परिसरात कुलू मनालीच्या धर्तीवर ई टॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे. दर्शन बारीला भाविकांसाठी ई टॉयलेट ची स्वयंचलित यंत्रणा उभी केली आहे. दरवाजा उघडल्यानंतर स्वयंचलित फ्लश यंत्रणा सुरु होते. आतील व्यक्ती बाहेर आल्यानंतर संपूर्ण युनिट आतून धुतले व स्वच्छ केले जाते. पाण्याच्या टॅकचीही पातळी स्वयंचलित पद्धतीने भरलेली ठेवली जाते. तसेच पॉ धुण्यासाठी देखील स्वयंचलित इलेकट्रॉनिक यंत्रणेवर चालणारे नळ बसविण्यात आले आहेत. शिवाय लहान मुलांचे डायपर नष्ट करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.