Nashik News : इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
Nashik News : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील (Rain) माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फाटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
Nashik News : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यावर आभाळमाया कमी झाली असताना पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फाटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
राज्यात जोरदार पाऊस बरसात असताना नाशिक जिल्हा आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी शहरात पावसाने हजेरी लावली असली तरीही अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत इगतपुरीकर आहेत. अशातच शहराला पाणी पुरवठा करणारी पाइपलाईनच फुटल्याने पाण्याचे जोरदार फवारे रस्त्यावर दोन तास उडत होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे नागरिकांनी सांगितले.
इगतपुरी शहराची लोकसंख्या वाढत असल्याने पूर्वी नगरपरिषद तलाव व तळेगांव येथील जीवन प्राधिकरण तलावातुन पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र अलीकडे हे पाणी कमी पडत असल्याने इगतपुरी शहराला भावली धरणातून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली. याच माध्यमातून भावली धरणातुन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. हे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु असून या पाईपलाईनसाठी जवळपास ३८ कोटी रुपये मंजुर होऊन काम प्रगतीपथावर आहे.
दरम्यान पाईपलाईन जोडणीचे काम सुरु असताना शहराजवळील पिंप्रीसदो परिसरात ही पाईपलाईन फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले आहे. अचानक पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे उंच फवारे रस्त्यावर उडत होते. अखेर रात्री उशिरा फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम करण्यात आले. तर पाईपलाईन टाकण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
भात पिकाचेही नुकसान
इगतपुरी शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाची ३८ कोटी रुपये निधी अंतर्गत नळ पाणी योजनेचे काम नगरपरिषदे मार्फत सुरू आहे. मात्र हि नवीन पाईपलाईनचे काम सुरु असताना पिंप्रीसदो गावाजवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. शिवाय रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे भाताचे बियाणे वाहुन गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पावसाच्या संबधित महत्वाच्या बातम्या
Maharashtra Rain: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा