एक्स्प्लोर

Nashik News : आता बायपासची भीती नाही; नाशिकमध्ये रुग्णांसाठी नवा पर्याय, अवघ्या काही तासांत रुग्ण होणार बरा

Nashik News : नाशिकमध्ये एसएमबीटीच्या माध्यमातून ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’ हा एक चांगला पर्याय रुग्णांसाठी उपलब्ध झाला आहे. 

Nashik News : बायपासचे नाव काढले तरी अनेकांच्या हृदयात ‘धस्स’ व्हायला होते. सहा-सात तास लागणारी भूल, तीन-चार दिवसांचे आयसीसीयूतील वास्तव्य. छातीवर, पोटावरच्या जखमा व जखमांचे व्रण, टाके, इन्फेक्शन, येणारा थकवा, मानसिक ताणतणाव यामुळे अनेकजण शस्रक्रिया टाळतात. मात्र, असा कुठलाही त्रास न होता ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’ हा एक चांगला पर्याय रुग्णांसाठी उपलब्ध झाला आहे. 

नाशिकमध्ये (Nashik) एसएमबीटीच्या माध्यमातून कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी (Angioplasty) या भव्य शिबिराचे आयोजन मुंबईनाका येथील एसएमबीटी क्लिनिक करण्यात आले आहे. यादरम्यान प्रख्यात हृदयरोग तज्ञ व एसएमबीटी हॉस्पिटलमधील (SMBT Hospital) हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. गौरव वर्मा रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे, या शिबिरात मोफत अँजिओग्राफी तर अवघ्या पाचशे रुपयांत 2 डी इको तपासणी केली जाणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

अनेक रुग्णांवर बायपास शस्रक्रिया (Bypass Surgery) करणे गरजेचे असतानाही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अवघड होते. अनेकांना वेगवेगळ्या व्याधी असतात, त्यामुळे अशा रुग्णांवर शस्रक्रिया करणे जिकरीचे होते. या रुग्णांना कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो. गेल्या महिन्यात 100 हून अधिक रुग्णांवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिरात कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी करण्यात आली. यासोबतच दर महिन्याच्या अखेरच्या शनिवारी आणि रविवारी बालहृदय विकारावर उपचार केले जात असून हजारो बालकांना नवे जीवन मिळाले आहे. 

कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीकडे रुग्णांचा वाढता कल

डॉ वर्मा सांगतात की, हृदयविकाराचे अनेक रुग्ण इतक्या अखेरच्या टप्प्यात रुग्णालयात येतात की, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याच्या शक्यताच मावळलेल्या असतात. तसेच अनेकांना बायपास शस्रक्रीयेची भीती वाटते. रुग्ण किंवा नातलग बायपास करण्यासाठी तयार होत नाहीत. अशा वेळी कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीचा पर्याय उपलब्ध असतो.  कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीसाठी लागणारी सर्व प्रकारची साधनसामुग्री एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मोठ्या शहरांत रुग्ण नेण्याची गरज आता राहिली नसून नाशकात हे उपचार करणे शक्य झाले आहे. कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी झाल्यानंतर अवघ्या काही तासांत रुग्ण बरा होतो, त्यामुळे या उपचाराकडे रुग्णांचा कल वाढला आहे. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.  

शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार

उपचार प्रक्रिया अवघड असली तरीदेखील शासनाच्या जीवनदायी आरोग्य योजनेत हा आजार मोडतो. त्यामुळे योजनेच्या माध्यमातून हे उपचार मोफत केले जात आहेत. सर्वसामान्य रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत या दृष्टीकोनातून एसएमबीटीकडून नुकताच एक व्हॉट्सअँप क्रमांक 9011067122 जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर रुग्णाचे रिपोर्ट्स पाठवल्यास संबंधित तज्ञ डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन केले जाते. शिवाय आयव्हीयुएस (IVUS), रोटाब्युलेटर (ROTA) सह जटिल अँजिओप्लास्टी, ओसीटी (OCT) गाईडेड अँजिओप्लास्टी, IVUS (इंट्रा व्हॅस्कुलर अल्ट्रा सोनोग्राफी गाईडेड अँजिओप्लास्टी हे उपचार देखील ‘एसएमबीटी’त शक्य होत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget