Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये 'राष्ट्रवादीचे घडयाळ' ठरले सुपरफास्ट, इतरांचं काय? पाहा कोणत्या पक्षाला किती जागा ?
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (Gram panchayat Election Result) राष्ट्रवादीने 41 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.
Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Grampanchayat Election Result) निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून जवळपास 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे (NCP) विजय मिळवला आहे. त्यामुळे एकीकडे नुकत्याच स्थापन झालेल्या शिंदे भाजप सरकारला जोरदार धक्का राष्ट्रवादीने दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, कळवण दिंडोरी या तीन तालुक्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election Result) पार पडली. यामध्ये नाशिकच्या 16, कळवण (Kalwan) 22 तर दिंडोरीच्या (Dindori) 50 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने आधीच्या सरकारच्या निर्णय खारीज करून पुन्हा एकदा सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचे ठरविले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीपैकी थेट सरपंच पदासाठी 259 तर सदस्यांसाठी 934 उमेदवार रिंगणात होते. तर या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ग्रामपंचायत 88 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रिया काल रविवारी भर पावसात पार पडली. जवळपास सकाळपासून भर पावसात सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेत खंड न पडता साधारण 80 टक्के मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरवात झाली होती. सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर कल हाती येण्यास सुरवात झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या घड्याळाने ऍक्टिव्ह मोडवर येऊन सर्वानाच आश्चर्य चकित केले. एकीकडे राज्यात शिंदे भाजप सरकार स्थपन झाल्यानंतर त्यांचीच हवा पाहायला मिळत होती. त्यामुळे इतर पक्षाचा सुपडा साफ झाला, असच जनतेलाही वाटत होत मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या घड्याळाने 'टिकटिक सुरु असल्याचे सांगत अजून शर्यत संपलेली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
राष्ट्रवादी आघाडीवर
नाशिक जिल्ह्यातील 8८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाल पहिला कल हाती आला असून राष्ट्रवादीने आघाडी घेतली असून जवळपास ४१ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. एकीकडे राज्यात शिंदे भाजप सरकार स्थपन झाल्यानंतर त्यांचीच हवा पाहायला मिळत होती. त्यामुळे इतर पक्षाचा सुपडा साफ झाला, असच जनतेलाही वाटत होत मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या घड्याळाने 'टिकटिक सुरु असल्याचे सांगत अजून शर्यत संपलेली नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.
असा आहे 88 ग्रामपंचायतींचा निकाल
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. काल रविवारी मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासुन मतमोजणीचा सुरवात झाली. दरम्यान सर्वाधिक 41 जगावर राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, दिंडोरी, कळवण तालुक्यातील आकडेवारी बघता यामध्ये राष्ट्रवादी 41, शिवसेना 13, भाजप 05, काँगेस 04, शिंदे गट 01, इतर 16, माकप 08 अशा एकूण 88 जागा आलेल्या आहेत. यानुसार राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून त्या खालोखाल शिवसेनेने बाजी मारली आहे.
स्वराज्य संघटनेची एंट्री
नाशिकमध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं विजय मिळवला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायतीवर निवडून आल्या आहेत. स्वराज्य संघटनेला महाराष्ट्रातून पहिला विजय हा नाशिक मधील गणेश गावातून मिळाला आहे. येथील रूपाली ठमके यांनी सरपंच म्हणून विजय मिळवला आहे. दरम्यान, नाशिक निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत.