Nashik Police : नाशिकचा क्राईम ग्राफ वाढतोय, नवे आयुक्त गुन्हेगारीवर 'अंकुश' लावणार?
Nashik Police : नाशिक शहरातील पोलिसिंगवर भर देण्याबरोबर सायबर क्राईम घटनांवर अंकुश लावण्यात जाईल.
Nashik Police : राज्यातील प्रत्येक शहरात वेगवगेळ्या समस्या असून तेथील कारणे स्वतंत्र आहेत, नाशिक (Nashik) शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसिंगवर भर देण्यात येईल, वाहतुकीच्या समस्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणीनुसार कार्यवाही होईल. त्याचबरोबर वाढती सायबर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी दिली
दरम्यान दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक IPS अधिकाऱ्यांच्या शासनाकडून बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचाही समावेश होता, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी नाईकनवरेंकडून नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली असून नाईकनवरेंसह शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारताच नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी निश्चित परिणामकारक उपाययोजना करू तसेच सायबर गुन्हेगारी आणि फसवणूकीच्या घटनांकडे विशेष लक्ष देऊ अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दली.
पिंपरी चिंचवड पुणे आयुक्त पदावरून नाशिक पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली, तर तत्कालीन आयुक्त जयंत नाईकनवरे यांची अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती झाली. गृह विभागाने या संदर्भात आदेश निर्गमित केल्यावर मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पदभार सोडल्याची स्वाक्षरीनंतर अंकुश शिंदे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आयुक्त शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासह वाहतूक सुरक्षा संदर्भात नाशिकमध्ये प्रभावी कार्य होईल. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचा आढावा घेतल्यानंतर कार्यवाहीची भूमिका ठरवण्यात येईल, नागरिकांचे मतही जाणून घेत जनरल पोलीसिंग आणि विशेषत फसवणुकीचे गुन्हे टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे स्वतः आयुक्त शिंदे यांनी केले.
दरम्यान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे नाशिक ग्रामीणच्या 2016 ते 17 या कालखंडात ग्रामीणचे अधीक्षक होते. यामुळे त्यांना नाशिकसह इथल्या गुन्हेगारी बाबत कल्पना आहे. परंतु नाशिक ग्रामीणच्या आधीचा पूर्ण अभ्यास आहे. मात्र नाशिक शहर नव्याने जाणून घ्यावे लागेल, त्यानुसार अधिकारी वर्गाशी चर्चा करून प्रत्यक्ष पाहणी करून सर्व स्तरावरील आढावा घेणार असल्याचे आयुक्त शिंदे म्हणाले. ज्या काही समस्या असतील त्यावर परिणामकारक काहीतरी करू.. वाहतूक समस्या असो, गुन्हेगारी असो किंवा ईतर काही.. सायबर क्राईम आणि फसवणूक या घटना बघता त्याकडे विशेष लक्ष देऊ.. आजच चार्ज घेतलाय स्थानिक बाबींचा आढावा घेतो असे ते म्हणाले.