(Source: Poll of Polls)
Nashik Crime : मसाज पार्लर नावालाच! नाशिक पोलिसांनी बरोबर हेरलं, असं उघड झालं रॅकेट
Nashik Crime : नाशिक पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात केला आहे.
Nashik Crime : नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात महत्वाची कारवाई केली आहे. स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) करण्यात आला आहे. नाशिक शहरातील शरणपूर रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर येथून सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) शहर यांनी शहरात छुप्या मार्गाने मसाज पार्लरच्या (Massage Parlor) नावाखाली चालणाऱ्या अनैतिक देहविक्री (Sex Racket) करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखे अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षास आदेश दिलेले होते. त्यानुसार शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैधरित्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या पार्लर चालकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार नाशिक शहरातील शरणपूर रोड (sharanpur Road) परिसरातील सुयोजित मॉडर्न पॉईंट येथील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या स्पा सेंटरमध्ये (Spa Center) मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होतं अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरमध्ये अनैतिक देहविक्री करण्याऱ्या पार्लर चालकांचा शोध घेत असतांना पोउनि सुनिल माळी यांना माहिती मिळाली. त्यानुसार शरणपूर रोड सुयोजीत मॉर्डन पॉईंट या इमरतीमध्ये स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु आहे. यातील अनेश अरुण उन्हवणे याने दोन गाळे भाडयाने घेऊन त्या ठिकाणी योग वेलनेस स्पा नावाने मसाज पार्लर सुरू केले. मात्र सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहविक्री चालत असल्याबाबत पोलीस तपासात समोर आले. नाशिक शहर यांनी कारवाई पथक तयार करून, योग वेलनेस स्पा येथे अनैतिक देहविक्री चालत असल्याची खात्री झाली. त्यांनतर पथकाने कारवाई करून मसाज पार्लरच्या नावाखाली एक संशयित महिला व ललित पांडुरंग राठोड यांना अटक करण्यात आली. कारवाई करताना मसाज पार्लरमध्ये सहा पिडीत महिला मिळुन आल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान संशयित महिला व ललीत राठोड या दोघांनी पिडीत महिलांना पैशांचे प्रलोभन दिले. त्यानंतर सदर पिडीत महिलांकडून देहविक्री करून घेण्याकरीता अनेश उन्हवणे याने गाळा मालक सागर अग्रवाल, पियुष ओमकार अग्रवाल यांच्याकडून गाळा भाडेतत्वावर घेतला. त्यांनतर संगनमताने स्वतःचे आर्थिक फायद्याकरता महिलांकडून जबरदस्तीने हे कृत्य करुन घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागरिकांनी थेट तक्रारी कराव्यात...
नाशिक शहरातील कॉलेज रोडवरील महात्मानगर, तसेच गंगापूरराेड यासारख्या उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या रहिवासी भागातच स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास कुंटणखाना चालवला जात असल्याचे पाेलिसांच्याच कारवाईतून वारंवार उघडकीस येत आहे. तरीही संबंधित व्यावसायिक महिना-दाेन महिने व्यवसाय बंद करून पुन्हा हा उद्योग सुरू करत असल्याची धक्कादायक बाब समाेर येत आहे. यापुढे शहरात कुठल्याही भागात मसाज पार्लर स्पाच्या नावाने चालणाऱ्या व्यवसायांवर करडी नजर ठेवली जाणार असून नागरिकांना असं काही आढळल्यास थेट तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.