Nashik Crime : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील अधिकारीच गेले तुरुंगात, कैद्यांची शिक्षा कमी करायचे.. !
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील (central Jail) अधिकारी कैद्यांकडून बक्कळ पैशांची मागणी करत त्यांना पॅरोल मंजूर करण्यासह रेकॉर्डवरील शिक्षा कमी करत असत.
Nashk Crime : नाशिकच्या (Nashik) मध्यवर्ती कारागृहातील (Central Jail) बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून यातील दोन संशयित तुरुंग अधिकाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली असून दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. हे तुरुंग अधिकारी कैद्यांकडून बक्कळ पैशांची मागणी करत त्यांनी त्यांना पॅरोल मंजूर करण्यासह रेकॉर्डवरील शिक्षा कमी करत असत. या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे.
नाशिकचे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून काही महिन्यापूर्वी येथील कैंद्याना पॅरोलवर सोडण्यात आणि शिक्षा कमी करण्यात कारागृहातील अधिकाऱ्यांचा हात असल्याचे समोर आले होते. दरम्यान या प्रकरणाने नाशिकसह राज्यात खळबळ उडाली होती. अखेर या तुरुंगाधिकाऱ्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 2017 मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी संस्थेत शामराव आश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा बंदी असलेल्या तिघा कैद्यांना शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लास्ट घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडले होते.
दरम्यान ही बाब कारागृह प्रशासनाचे लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यावर तुरुंगाधिकारी सतीश गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षा भोगणाऱ्या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाच घेऊन कैद्यांच्या शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कागदपत्रे खाडाखोड करून मुक्त किंवा शिक्षा कमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगाधिकारी संशयित शामराव गीते, माधव कामाजी खैरगे नाशिकरोड पोलिसांनी यांना अटक केली आहे. हे दोघेही अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने दोघेही नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयाला शरण आले होते. त्यानंतर येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा असून दोघांची न्यायालय कोठडीत रवानगी केली आहे. तसेच या गुन्ह्यातील तिसऱ्या संशयित लिपिक जयराम डबेराव यांनी देखील अटकपूर्व जामीन साठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
सेंट्रल जेलमध्ये सुरक्षा रक्षकाला मारहाण
नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये काही दिवसांपूर्वी संबंधित कैद्याला आणले होते. पुण्याच्या येरवडा तुरुंगात हा कैदी 302 च्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. संबंधित कैद्यास दुसऱ्या बॅरेक मध्ये जाण्यास बंदी केल्याने त्याने सुरक्षारक्षकावर हल्ला केला. प्रभू चरण पाटील असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास कैद्यांची तपासणी सुरु असताना संबंधित कैदी दुसऱ्या बॅरेक जात असल्याचे सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. यावेळी सुरक्षारक्षकाने त्यास हटकले असता त्याने सुरक्षारक्षकास मारहाण करण्यास सुरवात केली.