Nashik Bus Fire Accident : नाशिक बस दुर्घटना : आतापर्यंत अकरा मृतांची ओळख पटली, 27 हुन अधिक जखमींना डिस्चार्ज
Nashik Bus Fire Accident : नाशिक (Nashik) शहरातील औरंगाबाद महामार्गावर (Aurangabad Road) बस अपघातातील 11 मृतदेहांची ओळख पटली आहे.
Nashik Bus Fire Accident : नाशिक (Nashik) शहरातील औरंगाबाद महामार्गावर (Aurangabad Road) मालवाहू ट्रक आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणारे बसचा अपघातात (Nashik Bus Fire) मयत झालेल्या नऊ प्रवाशांचे मृतदेह पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले आहे. तर 11 मृतदेहांची ओळख पटली आहे. अद्यापही एका मृतदेहाचा ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
नाशिक (Nashik) शहरात झालेल्या खाजगी बसच्या अपघातामधील 12 पैकी मृतांपैकी नऊ मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे पार्थिव संबंधितांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत नऊ तर उर्वरित तीन पैकी दोन मृतदेहांची ओळख रात्री उशिरा पटली असली तरी त्यांचे मृतदेह अद्याप ताब्यात घेतलेले गेलेले नाहीत. त्यामुळे संबंधित दोन मृत्यू नातेवाईकांची खात्री पटवून ताब्यात दिल्यानंतर त्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे. एका मृतदेहाची ओळख पटली नसल्याने त्याचा डीएनए नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आज मिळण्याची शक्यता असून त्यानंतर 12 व्या मृतदेहाची ओळख पडण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.
पोलिसांनी आधार कार्ड ओळखपत्र व अन्य वेगवेगळ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करून वृत्तांच्या रक्ताच्या नातेवाईकांनाच मृतदेह सोपवले. या प्रक्रियेत अकरा मृतांची ओळख पटली असून त्यापैकी नऊ मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले. अन्य मृतांचे नातेवाईक पोचल्यानंतर ओळख पटवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान एका मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली असून त्याचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यानंतर या बाराव्या मृतदेहाची देखील ओळख पटणार आहे.
अनेकांना डिस्चार्ज
शनिवारी झालेल्या अपघातानंतर जवळपास 30 हुन अधिक जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अपघातातील 31 रुग्णांपैकी 27 रुग्णांना रविवारी सायंकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला. दोन महिला आणि दोन पुरुषांवर अद्यापही उपचार सुरू आहेत एक महिला गर्भवती असल्याने तिची विशेष दक्षता घेतली जात आहे
टोपण नावांनी घातला घोळ
दरम्यान मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना अपघातांच्या गोंधळात एक महिला अनेक पुरुषांना टोपण नावे असल्याने ओळख पटलेल्यांमध्ये त्यांची नावे दोन वेळा नोंदवली गेली. हा झालेला घोळ नातेवाईकांनी बॉडी ताब्यात घेताना निदर्शनास आला. प्रशासन आणि तातडीने हा घोळ सोडवत पुढील कारवाई केली.