एक्स्प्लोर

Nashik Railway : मनमाड रेल्वेमार्गावर 14 आणि 15 ऑगस्टला मेगाब्लॉक, 33 प्रवासी गाड्या रद्द; तर 19 गाड्यांचे मार्ग बदलले

Nashik Manmad Railway : मनमाड - जळगाव दरम्यान तिसऱ्या लोहमार्गाचे कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरु राहणार आहे.

Nashik News : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील (Bhusawal Division) मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान (Manmad Station) तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे 14 आणि 15 ऑगस्टला या मार्गावरील 33 गाड्या रद्द करण्यात आल्या असून, 19 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे (Railway Megablock) प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक असला तरी 13 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजीही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मनमाड मध्य रेल्वेच्या (Manmad Central Railway) भुसावळ विभागातील मनमाड-जळगाव स्थानकांदरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या कामाकरिता आणि दुहेरी मार्ग वार्ड रीमॉडेलिंग कामासाठी 14 आणि 15 ऑगस्ट रोजी या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये मनमाड रेल्वे स्थानकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या 33 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, 19 प्रवासी रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ऐन सुट्टीच्या मोसमातच रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

'या' गाड्या रद्द केल्या!

मनमाड स्थानकातून भुसावळ आणि नांदेडकडे जाणान्या गाडी क्र. 19513 देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस गाडी क्र. 22223 मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, गाडी क्र. 17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस गाडी क्र. 15119 इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, गाडी क्र. 12071 मुंबई जालना एक्स्प्रेस गाडी क्र. 02131 पुणे-जबलपूर एक्स्प्रेस गाडी क्र. 101025 दादर-बलिया एक्स्प्रेस गाडी क्र.12139 मुंबई नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस गाडी क्र. 11401 मुंबई आदिलाबाद एक्स्प्रेस गाडी क्र. 17617 मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, गाडी क्र. 17057 मुंबई-सिकंदराबाद एक्स्प्रेस या गाड्या 14 आणि 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या असून, गाडी क्र. 12113 पुणे-नागपूर एक्सप्रेस (14 ऑगस्ट) गाड़ी क्रमांक 01752 पनवेल रीवा रीवा एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट),  गाडी क्र. 12135 पुणे- नागपूर एक्सप्रेस (15 ऑगस्ट), गाडी क्र. 11039 कोल्हापूर गोदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस (१२ व १४ ऑगस्ट), गाडी क्र. 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस-नांदेड एक्स्प्रेस (15 ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ, कोपरगाव आणि नांदेडहून येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 19 प्रवासी रेल्वे गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

13 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 

भुसावळ- देवळाली एक्स्प्रेस, बलिया -दादर एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस.

14 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

भुसावळ - देवळाली एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर मुंबई वंदे भारत ट्रेन, भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, रीवा-पनवेल एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात गाड्या :

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस, दादर-बलिया एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पनवेल-रीवा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना-मुंबई एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस.

16 ऑगस्ट रोजी रद्द आणि मार्ग बदललेल्या गाड्या :

बलिया-दादर एक्स्प्रेस गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, 19 प्रवाशी गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत.

इतर महत्वाची बातमी : 

Central Railway : मनमाड-दौंड मार्गावर आजपासून तीन दिवसांचा मेगाब्लॉक, वेळापत्रकात बदल, गाड्यांचे मार्ग बदलले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
BJP Maha Adhiveshan : ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
ना बटेंगे तो कटेंगे, ना एक है तो सेफ है; भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
BJP : भाजपचं खेड्याकडे चला, सर्व मंत्र्यांना एक दिवस खेड्यात मुक्काम करावा लागणार, चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
महिन्यातून एक दिवस खेड्यात मुक्काम करा, भाजपच्या मंत्र्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवा टास्क
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
Embed widget