Nashik News : नाशिक-पुणे रेल्वचे जागा संपादनाचे काम 'हायस्पीड'मध्ये, जिल्ह्यातील 23 गावांत भू संपादन
Nashik News : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प (Nashik) लवकरच पूर्णत्वास येत असून खासगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) पुणे रेल्वेच्या जागा संपादनासाठी हळूहळू प्रक्रिया गतिमान होते आहे. या मार्गासाठी आपली शेतजमीन देण्यास प्रारंभी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. परंतु, नंतर भरीव मोबदला देण्याचे सांगितल्यानंतर आता खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ३० हेक्टर खाजगी जागा संपादन करण्यात आली आहे.
नाशिक पुणे प्रवासासाठी अद्यापपर्यंत थेट रेल्वे नसल्याने रस्ते प्रवास हा चार ते साडे चार तासांचा होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे मार्ग रेल्वेने जोडण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. अखेर हा नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. यासाठी जमिनी संपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी खासगी जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येत आहे.
दरम्यान जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प आता सुसाट वेगाने धावणार आहे. ज्या रेल्वेमुळे नाशिक-पुणे अंतर अवघ्या पावणेदोन तासांवर येणार आहे. त्या हायस्पीड रेल्वेच्या भूसंपादनासाठी आवश्यक 1450 पैकी 30 हेक्टर खासगी जागा संपादन करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली आहे, तसेच सरकारी आणि वनजमीन संपादनाचीही अत्यंत प्रक्रिया सुरू आहे.
नाशिक जिल्ह्याच्या विकासाबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकास देखील या माध्यमातून साधला जाणार आहे. नाशिक पुणे रेल्वे हि नाशिकबरोबर अहमदनगर जिल्ह्यातून जात असल्याने येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या या मार्गात जात आहेत. त्यामुळे प्रारंभी अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शविला होता. अकहर शासनाने या शेतकऱ्यांना भारी मोबदला देण्याचे काबुल केल्यानंतर जागा संपादनाचे काम जोरात सुरु आहे. नाशिक पुणे रेल्वेचे काम जवळपास चार वर्षात करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाला गेल्यास जवळपास 25 हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याची शकयता आहे.
30 हेक्टर जागा संपादन
नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पत आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुणे - नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत 23 गावात भूसंपादन
जिल्ह्यातील नाशिक आणि सिन्नर अशा दोन तालुक्यांतील देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, संसरी, नाणेगाव, (नाशिक), वडगाव पिंगळा, चिचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटप्रिपी, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी मजरे, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी खुर्द आणि बुद्रुक, नांदूरशिंगोटे, चास नळवंडी (सिन्नर) अशा 23 गावांतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे.