Jalgaon Sanitary Pad : जळगाव जिल्हा केळीसाठी देशभर अग्रेसर असलेला जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणावर केळीचे (Banana) उत्पादन होत असल्याने केळीचा घड कापून झाला की त्याचे खोड एक तर जनांवरच्या चाऱ्यासाठी वापरले जाते किंवा थेट उकीरड्यावर फेकले जात असल्याचं नेहमीच पाहायला मिळते. मात्र या केळीच्या खोडाचा जळगावमधील झाशीची राणी महिला बचत गटानं पुरेपूर उपयोग केला असून यापासून सॅनिटरी पॅड (sanitary Pad) बनवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. 
 
जळगाव (Jalgaon) शहरात आदर्शनगर भागात राहणाऱ्या अर्चना महाजन (Archana Mahajan) आणि रुद्रानी देवरे (Rudrani Deore) यांनी हा बचत गट सुरू केला आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळापासून या बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी लागणाऱ्या सॅनिटरी पॅडची (Womens Day) त्या निर्मिती करत आहेत. बदलत्या काळात प्लॅस्टिकच्या अतिरेकामुळे अनेक महिलांमध्ये कॅन्सरचे (Women Cancer) प्रमाण वाढत असल्याने प्लॅस्टिकचा वापर कमी कसा करता येईल. या विचारात असलेल्या अर्चना महाजन आणि रुद्राणी देवरे यांना केळीच्या वाया जाणाऱ्या खोडाची कल्पना सूचली. या खोडाच्या पासून कापूस बनवत त्याचा वापर सॅनिटरी पॅडसाठी करता येईल असा विचार झाला. यावर प्रयोग करण्यात येऊन सॅनिटरी पॅड तयार होऊ शकते, आणि तिथून कामाला सुरुवात झाली. महिलांच्या पाळीच्या दिवसात उपयोगात येणाऱ्या सॅनिटरी पॅड बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला असून त्यांच्या या उद्योगातून 20 महिलांना रोजगार तर मिळाला आहे. 


ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळावा. यासाठी नाबार्डतर्फे विविध योजना या राबविल्या जात असतात. त्यातील सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी जळगाव जनता बँकेने यासाठी अर्थ सहायता केले होते. तर मशिनरीसाठी ही सबसिडीवर मिळाली होती. आधुनिक तंत्राचा पॅड बनविण्यासाठी ऑटोमॅटिक मशीनचा वापर केल्यानंतर त्यात सुबकता आल्याने त्याला मागणी वाढली असल्याचे बचत गटाच्या सचिव रुद्रानी देवरे यांनी सांगितले. 


वीस महिलांना मिळाला रोजगार


संपूर्ण महिन्याचा विचार केला तर महिन्याला एक लाख पाच हजार पॅडची निर्मिती केली जाते. त्यासाठी चार लाख 72 हजारांचा खर्च येतो. सहा लाख तीस हजार रुपयांची दर महिन्यात उलाढाल होते. आणि त्यातून पावणे दोन लाख रुपयांचा निव्वळ नफा होत असून वीस महिलांना रोजगार मिळत असल्याचे झाशीची राणी बचत गटाच्या अध्यक्षा अर्चना महाजन यांनी म्हटल आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना सुद्धा दोन पैसे या माध्यमातून मिळू शकण्याची चिन्हे असून हा उपक्रम कृषी उद्योगाच्याबरोबर ग्रामीण भागातील महिलांना प्रेरणा देणारा ठरला आहे.


दिवसाला साडेतीन हजार सॅनिटरी पॅडची निर्मिती 


इतर पॅडच्या तुलनेत कमी किंमत असल्याने महिलांच्या दृष्टीने आर्थिक बचत ही होत असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे. केळीच्या खोडापासून झाशीची राणी बचत गटाच्या माध्यमातून रोज साडेतीन हजार सॅनिटरी पॅडची निर्मिती केली जाते. एक पॅड सहा रुपयांना विक्री केली जाते. एका पॅडसाठी साडेचार रुपये प्रति नग खर्च येत असतो. त्यातून रोज एकवीस हजार रुपये रोज मिळत असतो. तर साडे पंधरा हजार रुपये खर्च वजा जाता पाच हजार तीनशे रुपये यातून रोजचा नफा राहत असल्याचे महिलांनी सांगितले. 


सॅनिटरी पॅड निर्मितीची प्रक्रिया 


यासाठी सर्वात प्रथम केळीच्या खोडाचे तुकडे घेण्यात येतात. त्यानंतर गरम पाण्यात त्याचा लगदा तयार केला जातो. त्यापासून एका पुठ्ठ्याची निर्मिती केली जाते. आवश्यकतेनुसार या पुठ्याच्या पासून मिक्सरमध्ये ग्राईंडर करून त्यापासून कापूस तयार केला जातो. त्याचा वापर पॅड बनविण्यासाठी केला जातो. सॅनिटरी पॅडसाठी केळीचा वापर हा आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असल्याचं त्यांनी मान्यता प्राप्त प्रयोग शाळेत तपासणी करून घेतली आहे. शिवाय हे पॅड वापरताना प्लास्टीक पासून बनविलेले पॅड वापरताना महिलांना येणाऱ्या अडचणी जसे खाज सुटणे, दुर्गंधी येणे, इरिटेड होणे या सारख्या समस्या या पॅडमध्ये येत नसल्याचं वापरणाऱ्या महिलांचे अनुभव असल्याने त्याला महिलांच्या मधूनही चांगला प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे.