Unseasonal Rain : करमाळ्यातील वाशिंबे परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जमीनदोस्त
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिंबे शिवारातील काढणीला आलेल्या अनेक केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून ऐन होळीच्या सनात विघ्न ओढावले आहे.
अवकाळी पावसाचा केळी बागांना तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तसेच चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केळीला उच्चांकी दर मिळत असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिरावला आहे.
केळी बागांच्या नुकसानामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
केळी विक्रीतून येणारं लाखो रुपयांचं उत्पन्न या वादळाने हिरावलं आहे.
शिवाय खते, बी बियाणे, औषधे, मजुरी यात गुंतवलेले भांडवलही बुडाले आहे
दरम्यान या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.