(Source: Poll of Polls)
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला ब्रेक? उपमुख्यमंत्री फडणवीस प्रकल्पाबाबत म्हणाले...
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे हाय स्पीड (Nashik-Pune Railway) रेल्वे ऐवजी पुणे-नाशिक (Nashik) साठी आता रेल्वे कम रोड (Rail Cum Road) प्रकल्पाचा विचार करण्यात येत आहे.
Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे हाय स्पीड (Nashik-Pune Railway) रेल्वे ऐवजी पुणे-नाशिक (Nashik) साठी आता रेल्वे कम रोड (Rail Cum Road) प्रकल्पाचा विचार करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करून राज्य सरकार पुढील निर्णय घेईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस 9DCM devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच मुंबई ते सोलापूर मार्ग वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे रेल्वे चा प्रकल्प प्रकल्पाचे काम सुरू आहे. यासाठी अनेक भागात भूसंपादन देखील सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यातील रेल्वेच्या प्रकल्पांविषयी चर्चा केली. वैष्णव यांच्याबरोबर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा झाली. आईवेळी फडणवीस म्हणाले कि, हाय स्पीड रेल्वेसाठी अँड ग्रेट स्वरूपाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याऐवजी आता रेल्वे कम रोड असा प्रस्ताव देण्यात येणार आहे. याचबरोबर या प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले कि, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा ॲडग्रेड असल्यामुळे त्या ठिकाणी एवढ्या स्पीडनी गाडी घेणं हे जरा कठीण जाईल आणि म्हणून त्यामध्ये रेल्वे कम रोड प्रकल्प अवलंबवण्याची सूचना रेल्वे मंत्र्यांनी केली आहे. शिवाय हायस्पीड रेल्वेसाठी हा मार्ग फास्ट ट्रेड असल्याने रेल कम रोड मुळे अधिकाधिक सोयीस्कर होणार आहे. दरम्यान प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट
पुणे- नाशिक (Nashik-Pune) अति जलद हाय स्पीड रेल्वे (Highspeed Railway) मार्ग सह महारेलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले होते. दरम्यान पुणे नाशिक अति जलद रेल्वे मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये (Central Goverment) मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू करण्याचे सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र आता फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर हा प्रकल्प रेल कम रोड स्वरूपात पुढे येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे- नाशिक हायस्पीड प्रकल्प काय आहे?
नाशिक पुणे रेल्वे हाय स्पीड 235 किमी चा एकूण मार्ग पुणे अहमदनगर नाशिक जिल्हा असा आहे. देशातील सर्वात किफायतेशीर अति जलद मार्ग जवळपास 16 हजार कोटी रुपयांचा खर्चाचा प्रकल्प असून यात राज्याचा 3273 कोटींचा हिस्सा आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प हा दोन जिल्ह्यातून जात असल्याने या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात आहेत. शिवाय ही मार्गिका पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतून जाणार आहे. त्यासाठी 102 गावांमधील एक हजार 450 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. पुणे - नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सेमी हायस्पीड संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता हा प्रकल्प रेल कम रोड असा असणार आहे.