एक्स्प्लोर

सत्यजीत तांबे भाजपात आले तर स्वागतच... मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य अन् चर्चा

Nashik Girish Mahajan : सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

Nashik Girish Mahajan : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना काँग्रेस पक्षाने (Congress) निलंबित केल्याने ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्टपणे  मांडत आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचं वजन पाहता ते भाजपमध्ये आले तर त्याचा भाजपाला नक्कीच फायदा होणार असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) हे जळगाव जिल्ह्यातील (Jalgoan) जामनेर तालुक्यात शेंदुर्णी येथे एका भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या  निमित्ताने गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे. ते यावेळी म्हणाले कि, सत्यजीत तांबे यांना पक्षाने एबी फॉर्म देताना तो दुसराच दिल्याचं सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) सांगत आहेत. हा त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा विषय असल्याने त्यात आपण काही बोलत नाही, मात्र सत्यजित तांबे यांना त्यांच्या पक्षाने निलंबित केल्याने ते अपक्ष  झाले आहेत. आज ते काँग्रेसमध्ये राहिले नसल्याने ते काँग्रेसच्या विरोधात स्पष्टपणे आपली भूमिका मांडत आहेत. 

ते पुढे म्हणाले, तांबे यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले कि, भविष्यात देखील अपक्ष राहणार. त्यामुळे सत्यजीत तांबे जर भाजपामध्ये (BJP) येणार असतील तर त्याबाबत पक्ष श्रेष्ठी  निर्णय घेतील, मात्र सत्यजीत तांबे यांचं राजकीय क्षेत्रातील वलय पाहता ते भाजपामध्ये आले तर त्यांच स्वागत करायला हरकत नाही, त्याचा भाजपाला नक्की फायदा होणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य पाहता आगामी काळात सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर नवल वाटायला नको. तसेच आव्हाड प्रकरणांवर ते म्हणाले कि, जितेंद्र आव्हाड काय बोलले हे माहित नाही, मात्र जितेंद्र आव्हाड हे प्रसिध्दीमध्ये राहण्यासाठी नेहमीच वादग्रस्त विधाने करत असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

गिरीश महाजनांचा झुंबा डान्स व्हायरल.. 

तर दुसरीकडे धुळे शहरात गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात संपन्न झालेल्या 'हिट धुळे, फिट धुळे' या मॅरेथॉन स्पर्धेत क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी झुंबा डान्स केल्याचे पाहायला मिळाले. या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने 'हिट धुळे फिट धुळे' मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी झुंबा डान्स आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडेपाच वाजता मंचावर झुंबा डान्स सुरू झाला. त्यावेळेस गिरीश महाजन यांनी मंचावरती हजेरी लावली. त्याच वेळेस इतर स्पर्धकांसोबत आणि आयोजकांसोबत गिरीश महाजन यांनी मंचावरती झुंबावर ठेका धरल्याने उपस्थित सर्वांनीच झुंबा डान्सचा आस्वाद घेतला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 27 September 2024Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ,  दोन दिवस अमरावतीतSanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
Embed widget