एक्स्प्लोर

Nashik Crime : तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, बायकोसह सासूच्या त्रासाला कंटाळून पतीनं आयुष्य संपवलं!

Nashik Crime : बायकोसह सासूच्या त्रासाला कंटाळून पतीनं आयुष्य संपवल्याची (suicide) घटना नाशिक (Nashik) शहरात घडली आहे.

Nashik Crime : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना अनेक घडले आहेत. मात्र नाशिकमध्ये (Nashik) पंचवटी जवळील आडगाव शिवारात चक्क पत्नी तिचा मित्र व सासूबाईंच्या छळाला कंटाळून पतीनेच विषारी औषध (Poison) सेवन करत जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना समोर झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Adgaon Police) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून योगेश चंद्रकांत नागरे असे मयत युवकाचे नाव आहे. 

पत्नी व तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या जाताला कंटाळून पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नागरे हे एका खाजगी धान्य कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. आडगाव परिसरातील एका हॉटेलात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना समोर झाली होती. औषध सेवन केल्यानंतर मयत योगेशने त्याच्या भावाला विषारी औषध सेवन केले आहे, असे सांगितले. भावाने लागलीच घटनास्थळी पोहचून योगेशला एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. 

विशेष म्हणजे त्याने तीन महिन्यांपूर्वीच पूजा तिलक कुमार छेत्री हिच्यासोबत प्रेम विवाह केला होता. पूजाच्या मैत्रिणीसह सासू कडून वारंवार होणाऱ्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून योगेश याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. सुनिता चंद्रकांत नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा योगेश याची पत्नी पूजा, सासू सविता छेत्री व पूजाचा मित्र दीप व दीपची पत्नी अशा चौघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध मानसिक छळ करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. 

तीन महिन्यापूर्वी  प्रेमविवाह 
काही दिवसांपूर्वी माहिती योगेश हा पुणे ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तेथे त्यांनी खाजगी क्लास देखील लावला होता. या ठिकाणी त्याची पूजा छेत्री  या महिलेसोबत ओळख झाली. त्यातून त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. दोघेही नाशिकच्या इंदिरा नगर पोलिसांच्या हद्दीत पाथर्डी परिसरात राहत होते. तर योगेश हा सातपूर येथे एका खाजगी धान्य कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनीच पत्नी व सासूने वारंवार पैशांसाठी योगेशकडे तगादा लावला. त्यानंतर मित्र आणि त्याच्या पत्नीला बोलावून वेळोवेळी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्वांच्या छळाला कंटाळून योगेशने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Nashik Crime News: त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा
त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Embed widget