Nashik Electric Shock : धक्कादायक! आईस्क्रीमच्या फ्रीजचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, नाशिकमधील घटना
Nashik Electric Shock : नाशिकमध्ये (Nashik) चिमुकलीला फ्रीजचा शॉक (Freezer) Shock) लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Nashik Electric Shock : नाशिकमधून (Nashik) हृदय हेलावणारी बातमी समोर येत असून आईस्क्रीम (Ice-cream) घ्यायला गेलेल्या एका चिमुकलीला फ्रीजचा शॉक (Freezer) Shock) लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पालकांनी मुलांबाबत किती सजग असणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून निदर्शनास येते.
नाशिकच्या त्रिमूर्ती चौक (Trimurti Chauk0 परिसरातील काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. आईस्क्रीम घ्यायला गेले असताना फ्रिजसमोर उभ्या असणाऱ्या चिमुकलीला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली दुपारी घडली. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी असे मयत मुलीचे नाव आहे. ग्रीष्माच्या मृत्यूने कुलकर्णी कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
नाशिक त्रिमूर्ती चौकात कुलकर्णी कुटुंब राहते. गुरुवारी रात्री आठ वाजेला जेवण झाल्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास ग्रीष्मा आणि तिचे वडील विशाल कुलकर्णी हे आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर आले. परिसरातील एका मेडीकल शॉपवर ते दोघे आईस्क्रीम घ्यायला गेले. याचवेळी ग्रीष्मा ही आईस्क्रीमच्या फ्रिजसामोर उभी राहिली. तर तिचे वडील कुणाशीतरी फोनवर बोलत होते. याचवेळी ग्रीष्माला फ्रीजचा शॉक बसला. मात्र ती तशीच उभी असल्याने तिच्या वडिलाच्या हि बाब लक्षात आली नाही. ग्रीष्माच्या वडिलांचे फोनवर बोलणे देखील संपले. शेवटी काही मिनिटानंतर ती खाली कोसळली तेव्हा तिच्या वडिलांच्या लक्ष गेले.
दरम्यान ग्रीष्मा खाली कोसळल्यानंतर बेशुद्ध झाली असता तिला खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. फ्रिजच्या वायरिंगचा शॉक बसल्याने ही घटना घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
निष्काळजीपणाने घेतला जीव
दरम्यान ही घटना नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात घाडली. घटनेचा सीसीटीव्ही देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शिवाय व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे सदर मुलीचे वडील मेडिकल शॉपवर गेल्यानंतर कुणाशी तरी फोनवर बोलत असल्याचे दिसते. काही वेळानंतर मुलीला फ्रीजचा शॉक बसतो. मात्र तरीदेखील वडिलांच्या लक्षात ही बाब येत नाही. त्यांचे फोनवर बोलणेही होते. त्यानंतर मुलगी खाली कोसळल्यानंतर त्यांना दिसते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. एकूणच पावसाळ्याचे दिवस असल्याने लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष करून पाल्यांनी याबाबत सजग असले पाहिजे. पावसाळ्यात कुठे विजेची तारेचे कनेक्शन लूज असते, कुठे कट झालेले असते. अशावेळी काळजी घेणे महत्वाचे ठरते.