Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये प्रथमच सकाळी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार, उशीर केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) यंदा प्रथमच सकाळी 11 वाजता गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
![Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये प्रथमच सकाळी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार, उशीर केल्यास थेट गुन्हे दाखल होणार Maharashtra News Nashik News ganesh idols immersion in night still12 pm Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये प्रथमच सकाळी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार, उशीर केल्यास थेट गुन्हे दाखल होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/06/d554fd40a97e5909cefa9dfc5d50f923166245668317089_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Ganeshotsav : नाशिकच्या (Nashik) गणेशोत्सवात (Ganeshotsav) पोलिसांची सकारात्मक भूमिका असून त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री 12 वाजेपर्यंत पूर्ण करावे असा निर्णय गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठकीत झाला. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणूकीत धुमशान पाहायला मिळणार आहे.
गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणुकीच्या नियोजनासाठी मनपा, पोलिस प्रशासन गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी भद्रकाली पोलीस झाली. यावेळी शहरातील 29 मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय पोलीस प्रश्सानातील अधिकारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चा झाली. यात शहरातील वाकडी बारव येथून मिरवणुकांना सुरुवात होऊन गंगेवर समारोप होईल. दरम्यान आजच नाशिक पोलिसांच्या माध्यमातून मिरवणूक मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान यंदा प्रथमच सकाळी 11 वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. आज झालेल्या गणपती मंडळ आणि पोलिसांच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच सकाळी आकरा वाजता मिरवणुकीला सुरवात होणार असल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव मिरवणुकीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये मानाच्या गणपतीचे क्रमांक तसेच मिरवणूक मार्ग बदलण्याची काही मंडळांनी मागणी केली मात्र काही जणांनी या मागणीला विरोध केला. तसेच चिठ्ठी पद्धतीने गणेश मंडळांना क्रमांक द्या अशीही प्रमुख मंडळ पदाधिकाऱ्यांची मागणी केली.
उशीर केल्यास होणार गुन्हे दाखल
सकाळी 11 वाजता मिरवणूक सुरु होणार असून रात्री 12 वाजेपर्यंत चालणार मिरवणूक चालणार आहे. गेल्या वर्षी 1 वाजता मिरवणूक निघाली होती. मात्र यंदा प्रथमच सकाळी मिरवणूक निघणार आहे. पारंपरिक पद्धतीने वाद्य आणि ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक निघणार असून मिरवणुकीला उशीर केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. तर लाईट असलेले मंडळ शेवटी राहणार असून स्वागत करण्यासाठी मंडळ पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर जाणे टाळावे, पोलिसांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा विसर्जन मिरवणुकीत 21 गणेश मंडळ सहभागी होणार आहेत.
यंदा मिरवणूक सकाळी सुरु होणार
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असलेल्या गणेश विसर्ज मिरवणुकीत बदल करण्यात आला आहे. दरवर्षी एक वाजता सुरु होणारी मिरवणूक यंदा अकरा वाजता सुरु होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी एक ऐवजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. महत्वाचे म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूक यंदा कठोर नियम लावण्यात आले असून ज्या मंडळाची मिरवणूक रेंगाळेल, त्या पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)