Dasara Melava : नाशिकहून शिंदे-सेनेकडून 50 हजार कार्यकर्त्यांचा ताफा, दसरा मेळाव्यासाठी गर्दीची शर्यत
Dasara Melava : शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने नाशिकमधून (Nashik) 28 हजार तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने 25 हजार शिवसैनिकांना देण्याचा दावा केला आहे.
Dasara Melava : मुंबईतील (Mumbai) दसरा मेळावा (Dasara Melava) साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने नाशिकमधून (Nashik) 28 हजार तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने 25 हजार शिवसैनिकांना देण्याचा दावा केला आहे. मात्र या दावे प्रति दाव्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार खलबत सुरु असून कुणाची गर्दी जास्त, कुणाचे कार्यकर्ते जास्त याचीच शर्यत लागल्याचे पाहायला मिळत आहे.
काही तासांवर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून शिंदे गट आणि शिवसेना पक्षाच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत असून याबाबतची दोन्ही गटाची बैठक पार पडली आहे. त्यानुसार दोन्ही गटाकडून 25 हजाराहून अधिक लोक मेळाव्याला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. यासाठी त्या त्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले असल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नाशिक जवळपास दोन्ही गटाकडून 50 हजारांचा ताफा मुंबईकडे कूच करणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला नाशकातून 18 हजार शिंदे सैनिक जाणार असून शहर व ग्रामीण भागातून जवळपास 18 हजार लोकांना 337 बसेस व 424 वाहनांमधून मुंबईत नेले जाणार आहे. या लोकांचे चहा नाश्त्याची व्यवस्था गोष्टी टोल नाकाजवळ केली असून त्यानंतर रात्रीच्या खानपानाची जबाबदारी गाडी सोबत असलेल्या खास विश्वासू व्यक्तीवर सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर खरी शिवसेना आपलेच असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे यांनी पक्षाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर ठेवला आहे. शिवाजी पार्कच्या तुलनेत बीकेसी मैदान हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे शिंदे गटाने ताकद दाखवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दोन आठवड्यापूर्वीच नाशकात बैठक घेऊन जास्तीत जास्त लोकांना नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता दसरा मेळावा काही तासांवर आल्यामुळे तयारीचा वेग वाढला आहे.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिक मधून 25 हजार शिवसैनिकांना मिळेल त्या वाहनाने पाठवण्याची नेते पदाधिकाऱ्यांकडून तयारी केली जात आहे. आगामी निवडणुका आणि प्रतिपती गटाची तयारी पाहून त्यांचा नाशिक शिवसेनेने देखील जोरदार तयारी केली आहे. शिवसेना कार्यालयात बैठक पार पडली असून त्यात नाशकातून जवळपास 25 हजार शिवसैनिकांना मिळावा या नेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र मालेगाव, पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी या भागातील शिवसैनिकांसाठी स्वतंत्र 200 बसेसची बुकिंग करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा प्रमुखाला सहाशे व्यक्तींचे तर शिवसेना आणि संघटना प्रत्येकी एक हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. माजी नगरसेवक तसेच विभाग प्रमुखांना अनुक्रमे 100 ते 50 शिवसैनिकांना आणण्याचे उद्दिष्ट महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले तर मनमाड नांदगाव इगतपुरी येथील शिवसैनिक हे रेल्वेने जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मंत्री भुसेंकडे मोठी जबाबदारी
पालकमंत्री पद मिळाल्यामुळे दादा भुसे यांच्यासमोर आता जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचे आव्हान असून या निमित्ताने त्यांची मेहनत पणाला लागणार आहे. मालेगाव मधून 50 बसेस तो 125 टेम्पो ट्रॅव्हलर नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर मोठी भिस्त असून त्यांच्यावर तब्बल 100 बसेसची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांचे जास्तीत जास्त कार्यकर्ते मनमाड येथून रेल्वेने जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कार्य शिवसेनेचे वारसदार असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी 700 पेक्षा अधिक वाहनंत जाणारे 28 हजार कार्यकर्ते विचार ऐकण्यासाठी आतुर असल्याचे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तज्ञ यांनी सांगितले आहे.