Nashik Shivsena : खासदार गोडसेंनी भाकरी फिरवली, इगतपुरीच्या माजी आमदारांसह कार्यकर्ते शिंदे गटात
Nashik Shivsena : नाशिकमधून (Nashik) आता शिवसेनेनला जोरदार धक्का बसला आहे. इगतपुरीचे (Igatpuri) माजी आमदार काशिनाथ मेंगाळ (Kashinath Mengal) शिंदे गटात सामील झाले आहेत.
Nashik Shivsena : शिंदे सरकारच्या (Eknath Shinde) स्थापनेनंतर शिवसेनेला (Shivsena) एकप्रकारे उतरती कळा लागली आहे. राज्यभरातून शिवसनेनेचे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. तर नाशिकमधून (Nashik) आता शिवसेनेनला जोरदार धक्का बसला आहे. इगतपुरीचे (Igatpuri) माजी आमदार काशिनाथ मेंगाळ (Kashinath Mengal) शिंदे गटात सामील झाले आहेत.
एकीकडे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे (aditya Thakaray) यांनी नाशिक दौरा केला. यात त्यांना जिल्हाभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र तत्पूर्वी आमदार दादा भुसे (Dada Bhuse), सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या बरोबर खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनीही शिवसेनेला धक्का दिला. त्यानंतर आता इगतपुरी तालुक्यातुन शिवसेनेला दुसरा धक्का बसला असुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे शिंदे सेनेत दाखल झाले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाण्याची तयारी केली आहे. एकनाथ शिंदे गटात रोजच शिवसैनिक पदाधिकारी यांचा नव्याने प्रवेश होत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल होत असल्याचे जाहीरपणे दिसत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून शिंदे गटात जोरदार भरती सुरु आहे. बंड केलेले खासदार व आमदार आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अशातच शिवसनेत पडलेली फूट आणि शिवसैनिकांच्या फूटीचा येणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिकच्या दोन आमदार एक खासदारांनंतर आता माजी आमदार असलेले काशिनाथ मेंगाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेचे जयंत साठे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, घोटी ग्रामपालीकेचे माजी सरपंच संजय आरोटे, माजी सरपंच खंडेराव धांडे, यांच्यासह असंख्य शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले आहेत.
ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर...मात्र
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला होता. नाशिकमध्ये प्रवेश करण्यापूर्वी घोटी येथे त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. मात्र स्वागतासाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे उपस्थित नव्हते. मात्र मेंगाळ यांनी आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावले होते. अशातच आता मेंगाळ यांनी शिंदे गटात सामील होत शिवसेनेला धक्का दिला आहे.