Nashik News : नाशिकमध्ये विद्युत प्रवाहाचा धक्का लागून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू, महावितरणचे उघड्या डीपींकडे दुर्लक्ष
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा (Electric Shock) धक्का बसल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
Nashik News :नाशिकमधून (Nashik) धक्कादायक बातमी समोर येत आहे. उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरातील उघड्या डीपींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिक शहराजवळील पुणे रोडवरील हॅपी होम कॉलनी राहणाऱ्या अरमान मुन्ना अन्सारी या मुलासोबत ही घटना घडली आहे. शाळेला सुट्टी असल्याने हनुमान हा मित्रांसोबत खेळत होता. यावेळी त्याला विद्युत विभागाकडून लावण्यात आलेल्या डीपीच्या बाहेरचा शॉक लागला. यावेळी शॉक लागल्यानंतर तो गंभीरित्या भाजला गेला घटना सही उपस्थित नागरिकांनी त्याला रुग्णाला दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी विद्युत डीपींना चौकट व भिंत बांधावी, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून केली आहे. तर शहरात असलेल्या उघड्या विद्युत डीपी आठ दिवसात बंद न केल्यास तीव्र आंदोलनांचा इशारा छत्रपती शिवाजी मुस्लिम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान महावितरणकडून लावण्यात आलेल्या डीपीचे दार उघडे असल्याने ते धोकादायक ठरत असल्याचे अशा घटनांवरून समोर आले आहे.
शहरात अनेक भागात उघड्या डीपी
नाशिक शहरातील अनेक डीपी या घराशेजारी, मैदानालगत आहेत. अनेकदा या ठिकाणी लहान मुलांचा राबता असतो. त्यामुळे याकडेही महावितरणने लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीज प्रवाहासाठी भुयारी केबल टाकलेली असून तर अनेक ठिकाणी वीज प्रवासासाठी ट्रांसफार्मर खाली डीपी उभारण्यात आले आहेत. या डीपीतून उच्च दाबाच्या वीज प्रवासा संचार होत असतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी झाकण असताना इथे लावण्याची कष्ट कर्मचारी घेत नसल्याचे दिसते. त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतर महावितरण कामाला लागणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Maharashtra Politics Shivsena : पुन्हा कोर्टात धाव! शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात
'मध्यावधी लागणारच! गुजरातबरोबर महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, ही तात्पुरती व्यवस्था'; संजय राऊतांचा दावा
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?