Nashik Bogus Certificate : डॉ.सैंदाणे याने एमडी सर्जन भासवून दिले बनावट अहवाल, नाशिक बोगस प्रमाणपत्र प्रकरण
Nashik Bogus Certificate : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Bogus Certificate) प्रकरणातील फरार संशयितास नाशिक (Nashik) तालुका पोलिसांनी (Nashik Police) नंदुरबारमधील अक्कलकुवा येथून अटक केली आहे.
Nashik Bogus Certificate : नाशिक (Nashik) जिल्ह्यात सह राज्यभरात गाजलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र (Bogus Certificate) प्रकरणातील फरार संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणे (Dr. Swapnil Saindane) यांना नाशिक तालुका पोलिसांनी (Nashik Police) नंदुरबार मधील अक्कलकुवा येथून अटक केली आहे. बनावट वैद्यकीय अहवाल पोलिसांना वाटणाऱ्या डॉ. स्वप्नील सैंदाणे व त्याचा साथीदार संशयित विवेक ठाकरे यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी (Transfer) बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र रॅकेट काही दिसवांपूर्वी उघडकीस आले. यामध्ये ग्रामीण पोलीस दलातील 21 पोलीस कर्मचाऱ्यांवरच पोलीस दलाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे, पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज हे दोघे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान या प्रकरणात काही खाजगी रुग्णालयात समावेश असल्याचे समोर आले होते. त्यानुसार संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणेसह विवेक ठाकरे यास अटक करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आणलं होतं, तेव्हा या सामील असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले होते. तसेच जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीनिवास आणि डॉ. निखिल सैंदाणे, खाजगी रुग्णालयातील डॉ, स्वप्नील सैंदाणे आणि अनेक डॉक्टरांचा आणि कर्मचाऱ्यांचा याच समावेश आहे. दरम्यान खाजगी डॉ. स्वप्नीलने ज्या रुग्णालयाच्या नवे बनावट अहवाल दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या रुग्णालयात ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तपास सुरु केला आहे. तसेच डॉ. किशोर श्रीवास आणि लिपिक किशोर पगारे यांचा जमीन न्यायालयाने फेटाळला आहे.
दरम्यान या प्रकरणी संशयित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांना नंदुरबार जिल्ह्यात खाजगी डॉक्टर असल्याचे समजतात पथकाने त्यांना मंगळवारी अक्कलकुवा पोलिसांच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज जिल्हा न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. स्वप्नील सैंदाणे यांच्याकडे सर्जन पदवी नसताना एमडी सर्जन असल्याचं भासवून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या अहवालावर त्यांनी शक्य दिलेले होते.
जामीन अर्ज फेटाळला
आंतर जिल्हा बदलीसाठी लागणारे प्रमाणपत्र बनावट पद्धतीने बनवून दिल्याने संशयितांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. दरम्यान रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या दोन्ही डॉक्टर्सनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. दोन्ही डॉक्टरांचा अटकपूर्वक जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या दोघांनाही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र हे दोघेही सध्या गायब असल्याने नाशिक ग्रामीण पोलीस त्यांच्या मागावर आहेत. यामुळे पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.