एक्स्प्लोर

Dr. Ambedkar : अनोखं अभिवादन! पिंपळाच्या पानावर साकारली बाबासाहेबांची पोट्रेट रांगोळी

Dr. Ambedkar : पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन केले आहे

Dr. Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिनानिमित्त नाशिक (Nashik) येथील कला शिक्षक असलेल्या देव हिरे (Dev Hiray) यांनी अनोखे अभिवादन केले आहे. देव हिरे यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे. पिंपळाच्या पानावर बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा अनोखा प्रयोग असल्याचे हिरे यांनी सांगितले. 

06 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस. आजच्या दिवशी देशभरातच नव्हे जगभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले व आपल्या कलेने सर्वानाच आश्चर्य चकित करणारे देव हिरे यांनी अप्रतिम पोट्रेट रांगोळी पिंपळाच्या पानावर साकारण्याचा प्रयोग केला आहे. पिंपळाच्या पानावर यापूर्वी ब्रश रेखाटन, पेंटिंग, कटिंग असे बरेच प्रयोग अनेकांनी केले. पिंपळाच्या अवघ्या 5 इंचाच्या पानावर 4 इंच बाय 3 इंच जागेत डॉ.बाबासाहेबांची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा अनोखा विक्रम नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव.चे कलाशिक्षक देव हिरे यांनी महापरिनिर्वाण दिनी केला. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना तीन तासांचा अवधी लागला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या शेवटच्या क्षणी मार्गदाता मानलं. आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच बुद्धाला बोधीवृक्षाखाली बसून ज्ञानप्राप्ती झाली, अशा पिंपळाच्या पानावर देव हिरे यांनी रांगोळी रेखाटून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. हिरे यांनी यापूर्वी विविध महामानवांचे फलक लेखन, पोर्ट्रेट, रांगोळी काढून समाज प्रबोधन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर व देशपातळीवर आपल्या चित्रकला, रांगोळी कला,फलक रेखाटन कलेतून देव हिरे यांची नोंद झालेली आहे. पिंपळाच्या पानावरील बाबासाहेबांची ही अनोखी पोर्ट्रेट रांगोळी बघणाऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरली आहे. या अनोख्या प्रयोगासाठी कोणतेही स्केच न करता तीन तासातील चिमटीतील रांगोळी सोडण्याचे कसब व 35 ग्रॅम रांगोळी लागली. पिंपळाच्या अवघ्या 5 इंचाच्या पानावर 4 इंच बाय 3 इंच जागेत डॉ.बाबासाहेबांची पोर्ट्रेट साकारण्यात आले. 

भाकरीवर बाबासाहेबांच्या रांगोळी...  
देव हिरे हे आपल्या कलेतून नेहमीच चर्चेत असतात. चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा शाळेत ते कला शिक्षक म्हणून काम करतात. मात्र नेहमीच ते फलक लेखनातून, रांगोळीतून चर्चेत असतात.  मागील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाजरीच्या भाकरीवर बाबासाहेबांच्या प्रतिमेची रांगोळी काढत त्यांनी महामानवास अनोखं अभिवादन केलं होत. त्यानंतर आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळाच्या पानावर पोट्रेट रांगोळी साकारली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget