Nashik MNS : नाशिकच्या राजकारणातील मोठी बातमी! मनसेचे दिलीप दातीर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
Nashik MNS : नाशिकमध्ये (Nashik) मनसेला मोठा धक्का बसला दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
Nashik MNS : नाशिक शहराच्या (Nashik) राजकीय वर्तुळातून महत्वाची बातमी समोर येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द केला असून मनसेतील अंतर्गत गटबाजीतून राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
मनसेचे दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी अचानक शहराध्यक्ष पदाचा (MNS President) राजीनामा दिला असून दीड वर्षांपूर्वीच जिल्ह्याच्या जबाबदारीतून मुक्त करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्याकडे शहराची जबाबदारी दिली होती. मात्र अचानक दिलेल्या राजीनामामुळे चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. वैयक्तिक कारणाने आपण पदावरून पायउतार होत असलो तरी राज ठाकरे आणि पक्षासोबत आजीवन निष्ठा ठेवणार असल्याचे दातीर यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत नाशिक शहरातील (Nashik Politics) राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मनसेने आगामी काळातील निवडणुकांच्या धर्तीवर व्यवस्थापन सुरु होते. त्यामुळे अमित ठाकरे हे देखील अनेकवेळा नाशिक दौऱ्यावर आले होते. यासाठी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी वेळोवेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन योग्य नियोजन केले होते. त्याचबरोबर अंबड परिसरातील बहुचर्चित भंगार बाजार उठविण्यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष तसेच अलीकडे शहरप्रमुख पदांची जबाबदारी देवून विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक मुद्द्यांवर आंदोलने झाली. यामुळेच त्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.
एकीकडे राज्याच्या राजकारणात देखील राजीनामा नाट्यांसह पक्षा पक्षांमध्ये फूट पडत असताना नाशिक शहरातील राजकारणात महत्वाची घटना घडली आहे. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पदमुक्त करण्याची विनंती करणारे एक पत्र दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र या मागील कारण गुलदस्त असून लवकरच त्याचे खरं कारण समोर येणार आहे. त्यामुळे दातीर नेमके काय निर्णय घेतात? याकडे आता मनसैनिक व शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दिलीप दातीर यांनी काय म्हटलंय पत्रात?
'अत्यंत विनम्रपणे माझ्या वैयक्तिक कारणांमुळे पदावरून मुक्त करण्याची विनंती करत आहे. आपण माझ्यावर विश्वास टाकून पक्षात मला नाशिक पश्चिमची विधानसभा, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष सारखी मानाची पदे दिली. या पदांना मी माझ्या पूर्ण क्षमतेने, शंभर टक्क अधिकच देण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी आपण माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत मला मोलाचे मार्गदर्शन देत आले आहात. आपण मला जे प्रेम, आपुलकी व जिव्हाळा दिला आहे. त्यास अत्यंत भारावून गेलो आहे. मी जर माझ्या पदास पूर्ण न्याय देऊ शकत नसेल तर या पदावर राहण्याचा मला काही अधिकार नाही. असे मला वाटते. तरी आपणांस अत्यंत विनम्रपणे दरखास्त करतो की, आपण मला माझ्या शहराध्यक्ष पदावरून पदमुक्त करावे', असे आवाहन या पत्रातून केले आहे.