एक्स्प्लोर

Nashik News :  गुलाबी थंडी, विकेंडची धमाल, नाशिकमध्ये ख्रिसमस, न्यू इअर सेलिब्रेशनसाठी पर्यटंकाची गर्दी

Nashik News : नाशिकमध्ये ख्रिसमस, न्यू इअर सेलिब्रेशनसाठी सध्या पर्यटंकाची गर्दी वाढू लागली आहे.

Nashik News : गुलाबी थंडी, त्यात नाशिकचं (Nashik) आल्हाददायक वातावरण, मंदिराचं शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात सध्या पर्यटंकाची गर्दी (Tourist) वाढू लागली आहे. तसेच सध्या ख्रिसमस (Christmas year) आणि नव्या वर्षांच्या सुट्टीनिमित्त व नाशिकची गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक शहरात दाखल होत आहेत. 

नाताळाच्या (NataL) सुट्या निमिताने नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. धार्मिक तीर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या नाशिकची मंदिर गोदाघाट भाविक पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेत आहेत. एरव्ही धार्मिक विधी यासाठी येणारे भाविक श्रद्धेनं रामकुंडात डुबकी मारतात पण आज आनंदाची डुबकी बच्चे कम्पनीसह   त्यांचे पालकही मारताना दिसले. नाताळ विकेंडलाच आल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला असून पर्यटन स्थळे गर्दीने फुलून गेले आहेत.. देव दर्शन घेऊन नववर्षाचे स्वागत करण्याचा अनेकांचा ध्यास असून त्र्यंबकेश्ववर, सप्तशृंगी, काळाराम, कपालेश्वर अशा सर्वच मंदिरात भाविकांची गर्दी दिसते आहे. येथूनच काही अंतरावर असलेले त्र्यंबकेश्वर, वणी-सापुतारा तसेच शिर्डी या पर्यटन व धार्मिक स्थळांच्या ओढीमुळे पर्यटक नाशिकला वळत आहेत. 

दरम्यान नाशिक ही मंदिराची नगरी असून यंदा गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे पर्यटनवाढीवर परिणाम झाल्याचे जाणवत होते. मात्र वर्षभरापासून हे सावंत दूर झाल्याने आता पर्यटक नाशिकमध्ये येत आहेत. सध्या नाशिकसह  जिल्ह्यात गुलाबाई थंडी पडल्यामुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायास मिळत आहे. त्यामुळे उशिरा सुरू झालेला पर्यटकांना आवडणारा थंडीचा मोसम आता चांगलाच बहरला आहे. नाशिक परिसरातील मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी फुल्ल गर्दी केली असल्यामुळे पर्यटकांनी शहर बहरले आहे. नाशिक शहरातील काळाराम मंदिर, रामकुंड परिसर, पंचवटी परीसर, तपोवन, पांडव लेणी त्याचबरोबर इतर खासगी पर्यटस्थळे मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. 

त्याचबरोबर नाशिक शहराला लागूनच त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, सप्तशृंगी गड आदी महत्वाची पर्यटनस्थळे असल्याने नेहमीच गर्दी असते. त्यातच सध्याचा विकेंड असल्याने  पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. काही दिवसांवर नवीन वर्ष सुरु होणार असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी देखील पर्यटक नाशिकला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पांडवलेणी, चामरलेणी, रामशेज, अंजनेरी, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर परिसर, दिंडोरी, चांदवड परिसरातील ऐतिहसिक किल्ले पाहण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी फिरण्यासाठीही पर्यटक राजीखुशीने तयार होत असून, नांदूरमध्यमेश्वरला भेट देण्यासाठी पसंती देत आहेत. निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या व विविध वन्य प्राण्यांचा, पक्ष्यांचा वास्तव्य असलेले नांदूरमध्यमेश्वर नेहमीच पर्यटक, दुर्गभ्रमंती करणारे, पक्षी प्रेमी आदींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. 

रामकुंड पर्यटकांसाठी महत्वाचे.. 
दरम्यान नाशिकचे रामकुंड म्हणजेच गोदावरीचा परिसर हा नाशिककरांसह पर्यटकांसाठी महत्वाचा मनाला जातो. कारण या ठिकाणी धार्मिक विधींसह नाशिकच्या संस्कृतीचे दर्शन होत असल्याने हजारो पर्यटक नाशिकला आल्यावर रामकुंड परिसराला भेट देत असतात. त्यानंतर इतर ठिकाणी जात असतात. रामकुंडावर अनेक धार्मिक विधी केले जातात, ज्यामध्ये दशक्रिया, वर्षश्राद्ध, पिंडदान,  अस्थी विसर्जन यासारख्या विधी पार पडत असल्याने देशभरातून भाविक भक्त नाशिकला येत असतात. त्यातच यंदा गुलाबी थंडीने वातावरण सुंदर झाल्याने पर्यटकांचा राबता पाहायला मिळत आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget