Nashik Crime : नाशिकमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, नोटांचा ढीग पाहून पोलिसांना फुटला घाम
Nashik Crime : नाशिकमध्ये अपघातग्रस्त गाडीत नोटांचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) सातपूर परिसरात अपघाताची (Accident) घटना ताजी असतानाच अंबड परिसरात रात्री उशिरा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. मात्र अपघातानंतर अपघातग्रस्त गाडीत नोटांचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोटा बनावट (fake money) असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसही थक्क झाले आहेत.
नाशिकच्या अंबड परिसरात 29 डिसेंबर रोजी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अंबड पोलिसांनी धाव घेतली. मात्र अपघातातील एका वाहनात असे काही आढळून आले की ज्यामुळे नाशकात एकच खबर उडाली आहे हा कारचालक मध्ये धुंदी अवस्थेत होता मात्र त्याच्या गाडीत कोटेवाद्यांनी भरलेली बॅग मिळून आली आहे. मात्र यात सर्व बनावट नोटा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांपुढे देखील बनावट नोटा संदर्भात पेच निर्माण झाला असून नकली नोटा कुणाच्या त्या कुठून आल्या याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यांनतर धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेले माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या आधी तीन वाहनांचा अपघात झाला होता या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सुदैवाने या अपघातात किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जात घटनेची पाहणी करत तीनही अपघातग्रस्त वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. तर तपास करताना या कारच्या मागच्या बाजूला बॅग आढळून आली. चौकशी करता पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये कोट्यवधी रुपये असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारचालकासह कार पोलीस ठाण्यात आणली. दरम्यान पोलिसांनी बॅगमध्ये नोटांची तपासणी केली असता त्यात 500 आणि 2000 च्या नकली नोटा असल्याचे समोर आले. दरम्यान यापूर्वी देखील नाशिकमध्ये नकली नोटा आढळउन आल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे आता सापडलेल्या कोट्यवधी नकली नोटांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
नेमका अपघात कुठे झाला?
नाशिक अंबड परिसरात उंटवाडी रस्त्यावर असलेल्या चौगुले पासून काही अंतरावरच भरधाव वेगात येणाऱ्या या वाहनाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दोन-तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ही कार क्रेनच्या सहाय्याने अंबड पोलीस स्टेशनमध्ये ओढून नेण्यात आली. तसेच या वाहन चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.