एक्स्प्लोर

Nashik News : अवघ्या दहाव्या वर्षी प्रोग्रामिंग भाषेवर लिहले पुस्तक, नाशिकच्या आदिश्री पगारची कमाल 

Nashik News : नाशिकच्या दहा वर्षीय आदिश्री पगार हिने वेबसाईटला तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज संदर्भातील पुस्तक लिहले आहे. हे पुस्तक सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्डवर उपलब्ध आहे.

Nashik News : आपल्या विविध कलागुणांनी सर्वपरिचित असणारी नाशिकची (Nashik) आदिश्री पगार (Adishree Pagar) हिने पुन्हा लक्षवेधक कामगिरी केली आहे. आता आदिश्रीने अवघ्या दहाव्या वर्षीच पुस्तक लिहले असून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. एवढ्या कमी वयात पुस्तक प्रकाशित (Book Published) केल्याने तिच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

मूळची बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) उत्राणे येथील रहिवाशी असलेली आदिश्री नाशिकच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील सहावीत शिकते. लहानपणापासून आदिश्रीने वेगवगळ्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयत्न केला आहे. आदिश्रीने चौथीत असताना एका वेबसाईटची निर्मिती केली. या वेबसाईटच्या माध्यमातून तिने पाणीबचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आदिश्रीने उन्हाळ्याच्या शालेय सुट्यांत आमीर खान व किरण राव प्रस्तुत ‘तुफान आलंया’ या पानी फाउंडेशनच्या कार्यक्रमाने प्रेरित होऊन संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळातून पाणी वाचविणे व पाण्याचे महत्त्व याविषयीचा संदेश आदिश्रीने छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यानंतर आदिश्रीने वयाच्या पाचव्या वर्षापासून संकेतस्थळ बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा (Programming Language) अभ्यास तिने सुरू केला होता. संकेतस्थळ तयार केल्यानंतर आदिश्रीने आता कमालच केली आहे. वेबसाईटसाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग भाषेची एक पुस्तक तिने तयार केली असून, Learn Bootstrap Web Design असे ह्या पुस्तिकेचे नाव आहे. हि पुस्तिका प्रकाशित झाली असून आता अमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. पाणी बचतीसाठी, झाडांचे संवर्धन, शैक्षणिक अँप तसेच वाहतुक नियमांची माहिती देणारे विविध अँप ची निर्मिती केली आहे. 

पाण्याचे महत्व व बचतीसाठी तिने पहिली वेबसाईट तयार केली असून, कोरोनाच्या कठीण काळात आरोग्याच्या जनजागृतीसाठी दुसऱ्या वेबसाईटची निर्मिती केली आहे. स्वप्नातील गाव ह्या वेबसाईटच्या माध्यमातून एका आदर्श गावाची संकल्पना व त्यात कुठल्या सोयी सुविधा असाव्यात याविषयी माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न आदिश्रीने केला आहे. संगणक क्षेत्रात लिखाण करणाऱ्या जागतिक पातळीवरील लहान वर्गातील मुलांपैकी एक म्हणून आदिश्रीला ओळखले जाते. 

कमी वयात असंख्य पदके 
शैक्षणिक अभ्यासक्रमात आदिश्रीने आतापर्यंत International Olympiad Exam मध्ये १७ सुवर्णपदक व २ रजत पदक मिळविले आहेत. त्यात ३ विशेष प्राविण्य पदकासह गणितात मिळविलेल्या एका आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचा समावेश आहे. तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी या विषयात विशेष स्कॉलरशिपवर आदिश्रीने आपले नाव कोरले आहे. भारतातून निवड झालेल्या १४० विद्यार्थ्यापैकी आदिश्री हि एक आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा विशेष बालगौरव पुरस्कार व हिर्वांकुर फाऊनडेशनचा पर्यावरण क्षेत्रातील कामासाठी हिर्वांकुर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

झाडांना केले बोलके 
झाडांच्या संवर्धनासाठी व जनजागृतीसाठी तिने QR code प्रणाली विकसित केली असून १५० हून अधिक विविध प्रजातीच्या झाडांचे QR code चा यात समावेश आहे. पुस्तिकेच्या माध्यमातून मिळनाऱ्या निधीचा काही भाग ती झाडांचे संवर्धन व झाडांसाठीच्या QR code प्रोजेक्टवर उपयोगी आणण्याचा तिचा मानस आहे. आदिश्रीला अभ्यासाबरोबरच चित्रकला, स्केटिंग, पियानो वाजविणे, कत्थक, भरतनाट्यम, सायकलिंगची विशेष आवड आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget