एक्स्प्लोर

Nashik APMC Election : पिंपळगाव बाजार समिती निवडणूक मतमोजणी दरम्यान तुफान राडा, दोन्ही गट भिडले... 

Nashik APMC Election : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Pimpalgaon Bajar Samiti) निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Pimpalgaon Bajar Samiti) निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी लोकमान्य परिवर्तन पॅनलचे नेते आणि ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) आणि अपक्ष उमेदवार यतीन कदम मतमोजणी केंद्रावर आमने सामने येताच तुफान राडा झाला. यावेळी उपस्थित पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दीला बाजूला केले. 

आज नाशिक बाजार समितीसह (Nashik Bajar Samiti) सात बाजार समिती निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अनेक बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. अशातच महत्वाची समजली जाणारी पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत फेर मतमोजणीच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवार यतीन कदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक नितीन निकम यांच्यावर यतीन कदम धावून गेल्याने हमरीतुमरीवर गोष्ट आली. त्यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान आतापर्यंत पिंपळगाव बसवंत बाजार समिती निवडणुकीत दिलीप बनकर, अनिल कदम, गोकुल गिते, निवृत्ती शिरसाठ, दिपक बोरस्ते, रामभाऊ माळोदे, डॉ. प्रल्हाद डेर्ले, खालकर मनीषा, अमृता पवार, यतीन कदम, नंदु गांगुर्डे हे उमेदवार विजयी झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटात राजेश पाटील, शरद काळे आणि राजेश पाटील विजयी.तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यात हमाल मापारी गटातून शेतकरी विकास पॅनलचे रविंद्र दौलत पवार हे 75 मते मिळवून विजयी झाले आहेत. तर व्यापारी गटातून लोकमान्य परीवर्तन पॅनलचे सचिन अग्रवाल हे 170 आणि शेतकरी विकास पॅनलचे सुशील पलोड 158 मतांनी विजयी झाले आहेत. 

दहा टेबलवर मतमोजणी सुरू

दरम्यान पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीत काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यासाठी दहा टेबलावर मतमोजणी सुरु आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 98 टक्के मतदान झाले. पिंपळगाव बाजार समितीच्या 10 केंद्रांवर मतदान झाले. सहकारी संस्था गटात 98 तर ग्रामपंचायत गटात शंभर टक्के मतदान झाले. सहकारी संस्था गटात 930 पैकी 925 जणांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटात 651 मतदारांनी, व्यापारी गटात 661 जणांनी तर हमाल तोलारी गटात 370 जणांनी मतदान केले. जवळपास 2667 मतदारांपैकी पैकी 2603 जणांनी मतदान केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Embed widget