एक्स्प्लोर

BhujbalGadkari : रस्त्यावरून राजकारण, नाशिक-मुंबई महामार्गावरून भुजबळ गडकरींमध्ये रंगला कलगीतुरा 

Bhujbal Gadkari : नाशिक मुंबई महामार्गाच्या बांधकामावरून भुजबळ आणि गडकरी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

BhujbalGadkari : माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या काळात झालेल्या चुकांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून (Nitin Gadkari) दुरुस्ती केली जाणार असून नाशिककरांची (Nashik) वाहतूक कोंडीतून होणार आहे. नाशिक मुंबई महामार्गाच्या (Nashik Mumbai Highway) बांधकामावरून माजी मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नितीन गडकरी यांनी महामार्ग कॉंक्रेटीकरण करण्याची  घोषणा केली रस्ता झाला नाही अशी टीका भुजबळ केली होती. त्याला उत्तर देतांना भुजबळांच्या काळात झालेल्या कामातच चुका होत्या आधीच  मोठा रस्ता केला असता तर हि वेळ आली नसती असा टोला गकडकरींनी लगावला.

इगतपुरी (Igatpuri) येथे सातहुन अधिक रस्त्यांच्या कामाच्या उदघाटनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक मुंबई महामार्गावरून गडकरींनी भुजबळांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 15 डिसेंबर रोजी केलेल्या या टीकेला केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर देत भुजबळ आज कार्यक्रमाला उपस्थित हवे होते, अशी टिपणी ही केली. नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या जवळपास 1830 कोटी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नितीन गडकरी यांच्याहस्ते इगतपुरीमध्ये संपन्न झाला. यावेळी गडकरी यांनी नाशिक मुंबई महामार्ग सहा पदरीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्याची घोषणा केली. छगन 

नाशिक मुंबई महामार्गाचे भुजबळ हे सार्वजनिक मंत्री असताना या महामार्गाचे काम पूर्ण झाले. या रस्त्याच्या डिझायन मध्ये अनेकचुका होत्या. तेव्हाच रस्ता सहा लेनचा केला असता तर अडचण आली नसती, असा टोला गडकरी यांनी लगावला. एकीकडे भुजबळांच्या काळात झालेल्या चुका अधोरेखित करतानाच त्या दुरुस्त करण्याच्या सूचनाही गडकरी यांनी केल्यात. नाशिक मुंबई महामार्गाला इंदिरानगर आणि राणेनगर परिसरात अंडरपास आहे, मात्र अंडरपासला लागून असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीपेक्षा अंडरपास छोटा आहे. त्यातच मुंबईकडून नाशिक शहरात येणाऱ्या आणि नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनासाठी अंडरपासच्या तोंडावरच रॅम्प असल्यानं दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होते. 

शिवाय वाहतूक पोलिसांची नेमणुक करून एकेरी वाहतूक करूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटत नसल्यानं खासदार हेमंत गोडसे यांच्या मागणीनुसार अंडरपासची लांबी वाढविण्याचा आणि त्यावर दोन छोटे समांतर पूल करण्याचा त्याच बरोबर आणखी एक अंडरपास करण्याच्या कामाला गडकरींनी हिरवा कंदील दाखविला आहे. इंदिरा नगर बोगदा पासून केलेला बोगदा असून यात वाहतूक समस्या अंडरपास, रस्त्याची एकूण परिस्थिती काय आहे, हे लक्षात येईल. यासह द्वारका सर्कल ते नाशिकरोड या सहा किलोमीटरच्या रस्त्यावर नागपूरच्या धर्तीवर उड्डाणपूल बांधणे, सुरत चेन्नई महामार्ग, मोट्रोच्या कामाला गती देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्यानं शिंदे फडणवीस सरकारच्या काळात नाशिकला मोठे प्रकल्प सुरु करण्याचे संकेत गडकरी यांनी दिलेत. 

काय म्हणाले होते भुजबळ... 
गडकरी यांनी मुंबई नाशिक असा कारने प्रवास करावा, अन्यथा जाताना हेलिकॉप्टरमधून रस्त्याची पाहणी करावी, असे भुजबळ म्हणाले. यूपीआयच्या काळामध्ये ज्यावेळेला नाशिक मुंबई महामार्गाचा निर्णय घेण्यात आला त्यावेळीपुढील काही वर्षांत दोन्ही बाजूने एक एक लेन वाढविण्यात येईल, नंतर वेळोवेळी डागडुजी होईल, असा आराखडा तयार करण्यात आला. मात्र तसे झालं नाही, आणि नाशिक मुंबई रस्त्याची वाट लागली. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सहा तासांत माणूस येऊ शकत नाही. रस्त्याच्या दुरवस्थेने परिसीमा गाठली, वाहन छावण्या योग्य रस्ता नाही महामार्ग म्हणावा असा रस्ता नाही, निदान  हेलिकॉप्टर मधून जाताना रस्ता बघावा , काँक्रीटीकरण होत नाही तोपर्यंत रस्ता सुस्थितीत करावा, अन्यथा अधिकारी कंपनी कार्यलयात धडकणार असल्याचा इशारा दिला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget