Eknath Shinde Nashik Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा नाशिक दौरा! कांदे, भुसेंना मिळणार बळ, तर मालेगावला नवी ओळख?
Eknath Shinde Nashik Tour : नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मालेगाव जिल्हा (Malegoan) निर्मिती संदर्भात महत्वाची घोषणा करणार असल्याचे समजते.
Eknath Shinde Nashik Tour : मालेगाव (Malegoan) जिल्हा निर्मिती आणि नारपार वळण योजना या दोन महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मालेगावात मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तीस जुलै रोजी मुख्यमंत्री शिंदे नाशिक मालेगाव (Nashik) दौऱ्यावर येत आहेत.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) गळती रोखण्यासाठी विविध दौरे करण्यात आले. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 30 ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान नाशिक मधून शिंदे गटात सुहास कांदे (Suhas Kande) आणि दादा भुसे (Dada Bhuse) दाखल झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) हे देखील शिंदे गटात सामील झाले. आहेत. विशेष म्हणजे मालेगाव मतदारसंघातील आमदार दादा भुसे हे एकनिष्ठ असलेले शिवसैनिक सुरुवातीलाच शिंदे गटाबरोबर होते. त्यामुळे या दौऱ्यात मालेगावबाबत विशेष निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिकृत दौरा आला नसला तरी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठक घेण्यात आली आहे. त्याचबरोबर मालेगाव महापालिकेने देखील याबाबत तयारी केल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. मालेगाव येथील कॉलेज मैदानावर ही सभा होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री मनमाड येथेही जाण्याची शक्यता आहे. मालेगाव जिल्हा निर्मितीला शिंदे सरकारकडून गती मिळण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने मालेगाव स्वतंत्र जिल्हा निर्मितीसाठी माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे.
कांदे, भुसेना देणार बळ
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा करत बंडखोर आमदार खासदारांना चांगलेच सुनावले होते. सुहास कांदे यांच्या मतदारसंघात मेळावा घेऊन आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर आगपाखड केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे कांदे आणि भुसे यांना बळ देण्यासाठी नाशिक दौरा करत असल्याचे समजते. त्याचबरोबर नाशिक दौऱ्यात मालेगाव हे महत्वाचे असल्याने येथील जिल्हा निर्मितीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित
गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न प्रलंबित आहे. थेट घोषणा होऊनही प्रत्यक्ष कार्यवाही देखील झालेली नाही. त्यामुळे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या दौऱ्यात काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.