एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Chhagan Bhujbal : शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण... छगन भुजबळ म्हणाले... 

Nashik Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तरी सरकार पडणार नाही, याच कारण छगन भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

Nashik Chhagan Bhujbal : संजय राऊत (Sanjay Raut) संपादक असून त्यांना याबाबत माहिती असल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत वक्तव्य केले आहे. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते. मात्र एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा असणार आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि 16 आमदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्यातच अनेकवेळा सुनावणी होऊनही 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच काल अमरावती येथे शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aaghadi) महत्त्वाचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तत्पूर्वी जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत या सरकारचे डेथ वॉरंट काढल्याचे बोलले होते. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळणार असल्याचे ते म्हणाले होते. या सगळ्या प्रश्नावर अनेक राजकीय आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, संजय राऊत संपादक आहेत, ते दिल्लीमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून 16 आमदारांबाबत जी केस सुरु आहे. त्याबाबत जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असल्याने सरकार पडणार नाही असे समीकरण छगन भुजबळ यांनी मांडले आहे. 

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं शरद पवार म्हणाले. "अजून आमची आपसात चर्चा झाली नाही, जागावाटप कसं करायचं ते ठरलं नाही, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आता सांगू शकत नाही. एकत्र लढण्याची इच्छा आहे पण फक्त इच्छा पुरेशी नसते," असंही पवारांनी म्हटलं आहे. यावर भुजबळ म्हणाले की, "शरद पवार मोजून मापून बोलतात. अनेक पक्षांच्या आघाडी होतात आणि त्यात बिघाडी देखील होत असतात.याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईलच असे नाही. शरद पवार महाविकास आघाडी तुटणार असे म्हणाले नाही. कुठल्याही आघाडीमध्ये काही अडचणी येत असतात. त्या अर्थाने ते बोलले, आज तरी आघाडी आहे. त्यामुळे याचा अर्थ असे नाही की ताबडतोब आघाडीमध्ये बिघाडी होईल असे नाही."

.... तर त्यात वाईट काय?  

गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांसह सोशल मीडियावर अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. खुद्द अजित पवार यांनी स्वतः मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असेही म्हटले आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री होणार का? असे प्रश्न विचारल्यावर कोणीच नाही म्हणणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात काम करत आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्री होणार असे बोलले असतील, तर त्यात वाईट काय? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget