Lumpy Disease : लंपी झालेल्या गायीचे दुध प्यायल्यास माणसांना लम्पी रोग होतो का? आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या...
Lumpy Disease : लंपी झालेल्या गायीचे दुध प्यायल्यास माणसांना लम्पी रोग होतो का? यावर आरोग्य मंत्री भारती पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Lumpy Disease : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव वाढत असून त्यात लम्पी बाधित गाईचे दुध (Milk) पिल्याने माणसांना आजार होतो का? तर यावर केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लम्पी बाधित गाईचे दुध पिल्यास माणसांना कोणताही धोका नसून दुध उकळून प्यावे अशी माहिती पवार यांनी दिली आहे.
लंपी चर्मरोगाचा प्रसार राज्यात जलद गतीने होत आहे. लंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार फक्त पशुधनामध्ये आढळून असून लंपीचा फटका सर्वाधिक दुपट्या जनावरांना बसतो आहे. सद्यस्थितीत अनेकांना प्रश्न पडला असून लंपी गाईचं दूध प्यायल्याने माणसाने लंपीचा प्रादुर्भाव होतो अशी भीती पसरली आहे? पण खरंच लंपी बाधित गायीचे दूध प्यायला माणसांना लांबीचा प्रादुर्भाव होतो का? यावर केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार म्हणाल्या कि, घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्या दुधाचा वापर आपण करत असतो, ते कच्चे असले तरी उकळून घेतलेले असते. त्यामुळे त्यापासून माणसाला कोणताही धोका नाही. जे वापरतात ते उकळून घेतलेलं असेल तर ते पूर्णपणे सेफ आहे. म्हणून याबाबतीत गैरसमज पसरू नका आणि घाबरून पण जाऊ नका. दुधावर याचा कुठलाही परिणाम होत नसून त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही. म्हणून लंपी बाधित गाईचे दूध सुरक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले आहे.
दुसरे असे कि सध्या जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सनी जनावरांचे रेट जास्त घेऊन लसीकरण करत असल्याची तक्रार आहे. मात्र शेतकऱ्यांनी संबधित डॉक्टरांना बळी पडू नये, जिल्ह्यात लसींचा मुबलक साठ उपलब्ध असून चुकीची माहिती पसरवू नये. तसेच संबधित
डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. तसेच लसीकरणादरम्यान जनावरांमध्ये काही लक्षणे दिसतील तर तात्काळ संबधित पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन खात्याशी संपर्क करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी केले आहे.
दुध उकळून प्या ...
दरम्यान राज्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असून अशातच माणसामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र लंपी बाधित जनावरांच्या सानिध्यात आल्याने किंवा दूध पिल्याने माणसाला रोग होत नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच लंपी बाधित जनावरांच्या बाजूला उभा राहिल्याने कोणताही धोका नाही. लंपी आजार जनावरांमधून माणसांमध्ये संक्रमित होत नाही. दूध उकळून प्यायल्यास कोणताही धोका नाही. जगात माणसाला लंपी झाल्याचं एकही उदाहरण नाही. हा आजार केवळ म्हशी आणि गाईंनाच होत असून त्यातही हे प्रमाण दोन टक्के असल्याचे प्राथमिक माहिती आहे.