Nashik Gram panchayat Election : नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर, असा आहे आतापर्यंतचा निकाल
Nashik Grampanchayat Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत साठहून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत.
Nashik Grampanchayat Election : नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत साठहून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून त्यानुसार भाजप पक्षाची आघाडी असून जवळपास 30 हुन अधिक जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट असा अनुक्रमे निकाल हाती आला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून जिल्ह्यातील एक एक ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का
नाशिक जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायती धक्कादायक निकाल हाती आला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर यांना धक्का बसला असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता गमावली आहे. तर या ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदी ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी झाले आहेत.
चांदवडमध्ये भाजपाची सरशी...
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींपैकी 22 निकाल हाती आले असून भाजप - 11, ठाकरे गट - 1, शिंदे गट – ००, राष्ट्रवादी - 4
कॉग्रेस - 3, महाविकास आघाडी - 1, ईतर - 2 असे निकाल आहेत. वीस पैकी दहा ग्रामपंचायतीवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानुसार भाजप आमदार राहुल आहेर यांचे वर्चस्व कायम आहे. यामध्ये आडगाव - लताबाई घुले - भाजप, शेलू - अमोल जाधव - भाजप, पाटे कोलटेक - रंगनाथ सूर्यवंशी - महाविकास आघाडी, निंबाळे - रविना विष्णू सोनवणे - भाजप, चिचोले - पवन साहेबराव जाधव - भाजप असे विजयी उमेदवार आहेत.
देवळा तालुक्यात 13 पैकी 11 ग्रामपंचायतवर भाजप
नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा निकाल हाती आला असून देवळा तालुक्यावर भाजपाने कमळ फुलविले आहे. या तालुक्यातील 13 पैकी 11 ग्रामपंचायतींवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे देवळा तालुक्याचा बालेकिल्ला पुन्हा भाजपाच्या ताब्यात गेला आहे. देवळा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत मध्ये पौर्णिमा सावंत भाजप विजयी झाल्या असून देवळा तालुक्यात भाजपचे वर्चस्व आले. तर 1 राष्ट्रवादी 1 अपक्ष अशी जागा विजयी झाल्या आहेत.
दादा भुसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय, मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले.
नाशिक जिल्ह्यातील महत्वाची समजल्या जाणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पहिला निकाल हाती येत आला असून शिंदे गटाचे मंत्री दादा भूसेंच्या मालेगावमध्ये भाजपने खाते उघडले आहे. चौकट पाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे समाधान पवार विजयी झाले आहेत. तर सटाणा तालुक्यातील मतमोजणी संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
नाशिक तालुक्यातील 13 पैकी जागांचा निकाल हाती
दरम्यान नाशिक तालुक्यातील 13 पैकी जागांचा निकाल हाती आला असून यामध्ये सर्वाधिक जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. तर शिंदे गटाला दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. यामध्ये शिंदे गटाला 02, ठाकरे गट 05, भाजप 02, काँग्रेस 01, राष्ट्रवादी 01 आणि इतर 2 अशी जागांवर उमेदवारांनी विजयी मिळवला आहे.
कळवण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीचे निकाल
कळवण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला असून आतापर्यंत सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 4, माकप 3, भाजप 2 अशी निकाल हाती आला आहे