Shirdi Saibaba : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार फुले वाहता येणार
Shirdi Saibaba : लाखो साईभक्तांसह शिर्डी साईबाबा मंदिर (Shirdi Saibaba) परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
Shirdi Saibaba : लाखो साईभक्तांसह शिर्डी साई बाबा मंदिर (Shirdi Saibaba) परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. लवकरच शिर्डी -साईमंदिरात दोन वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुल, प्रसादावरील बंदी हटवली जाणार आहे. यासाठी साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साईबाबांना हार फुले वाहता येणार आहेत.
कोविडमुळे (Corona Crisis) दोन वर्षांपूर्वी साईमंदिरात हार, फुल, प्रसाद घेऊन (Flowers) जाण्यास घातलेली बंदी अद्यापही कायम आहे. बंदीच्या निर्णयाने शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बंदी उठवावी या मागणीसाठी आठ महिन्यांपूर्वी साईमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आंदोलन केले होते.. महसूलमंत्री तथा शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती.
दरम्यान या समितीच्या अहवालानुसार साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी साईसंस्थानकडून दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बंदी उठल्यानंतर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती केली जाते. या सर्व शेतकऱ्यांना हार फुले बंदीचा फटका सहन करावा लागत होता. मात्र आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे.. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत..
दोन वर्षांपासून हार फुलांवर बंदी
दरम्यान हार फुलांवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी 8 महिन्यांपूर्वी साईमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आंदोलन केले होते. महसूलमंत्री तथा शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार साई संस्थानच्या तदर्थ समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला साईचरणी फुल, हार, प्रसाद वाहण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी साईभक्त करत आहेत. आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साईभक्तांची लूट थांबून परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.