(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये साडे पाच वाजेची अजान सुरु झाली अन् मिरवणुकीसह ढोल वादन थांबवलं!
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) गणेश विसर्जनाच्या (Ganesh Immersion) मिरवणुकी दरम्यान अजान (Ajan) सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली.
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) आज गणेश विसर्जनाच्या (Ganesh Immersion) निमित्ताने हिंदू मुस्लिम अनोखा उदाहरण पाहायला मिळाले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अजान (Ajan) सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली. जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने (Dhol Pathak) वादन थांबवलं.
अखेर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) नाशिकमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुक मोठ्या जल्लोषात सुरु आहे. सकाळी अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. नाशिक शहरातील नेहमीच्या वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी असून त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे.
दरम्यान सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणूक दुध बाजार पोलीस चौकी जवळ आल्यानंतर त्या दरम्यान अजान सुरु झाली. यावेळी गणेश विसर्जन मिरवणूक थांबवण्यात आली. जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं. त्यानंतर अजून होईपर्यंत काही वेळेसाठी ही मिरवणूक देखील थांबवण्यात आली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजात एक अनोखा एकोपा असल्याचा हे जिवंत उदाहरण नाशिक मध्ये पाहायला मिळाले. बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अत्यंत सकारात्मक असा संदेश या माध्यमातून संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला सुद्धा देण्यात आला.
हिंदू मुस्लिम एकोप्याचे उदाहरण
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अजान सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली. जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं. या निमित्ताने हिंदू मुस्लिम अनोखा उदाहरण पाहायला मिळाले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान अजान सुरू होताच ही मिरवणूक थांबवण्यात आली. जुन्या नाशिक भागातून मिरवणूक जात असताना अजान सुरू झाल्यानंतर ढोल पथकाने वादन थांबवलं. त्यानंतर अजून होईपर्यंत काही वेळेसाठी ही मिरवणूक देखील थांबवण्यात आली. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजात एक अनोखा एकोपा असल्याचा हे जिवंत उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले.
मिरवणुकीचा उत्साह
दोन वर्षांच्या कालावधीनंतर बाप्पाचे दिमाखात आगमन झाले. त्यानंतर दहा दिवसांच्या आनंदायक वातावरणात बाप्पाचा सोहळा पार पडला. मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणेशाचे नाशिकरांनी दर्शन घेतले. मात्र आज बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. नाशिकच्या वाकडी बारव परिसरातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला असून मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मिरवणुकीला शुभारंभ झाला आहे. सुरवातीला महानगरपालिकेच्या बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरवात झाली. शहरात पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात महापालिकेचे गणपतीची मिरवणूक सुरू करण्यात आली.