Aditya Thackeray In Nashik : 'राजकारण किती घाणेरडं असत, अनुभव दोन महिन्यात घेतला' आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र
Aditya Thackeray In Nashik : राजकारण (Maharashtra Politics) किती घाणेरडं असत, याचा अनुभव मागील दोन महिन्यात घेतला, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thakaray) बंडखोरांवर टीकास्त्र सोडले.
Aditya Thackeray In Nashik : हे अल्पायुषी, तात्पुरत सरकार असून लवकरच कोसळणार आहे. आता बंडखोर नजेरला नजर मिळू शकत नाहीत, मात्र माझ्या चेहऱ्यावर आज स्वाभिमान, अभिमान आहे, कारण मी विकलो गेलो नाही. त्यामुळे सत्य बोला, गुंडगिरी सोडा, समाजसेवा करा, लोकांची सेवा करा, लोक तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचतील, मात्र अशा पद्धतीने लोकांना फसवत राहिलात, वागत राहिलात तर हेच लोक तुम्हाला गाडतील, राजकारण किती घाणेरडं असत, याचा अनुभव मागील दोन महिन्यात घेतला, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thakaray) बंडखोरांवर टीकास्त्र सोडले.
आदित्य ठाकरे हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेचे (Shivsamvad Yatra) आयोजन केले होते. या निमित्ताने त्यांनी मनमाड (Manmad) मध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील नंतरच्या काळात राजीनामे दिले. यामुळे शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शिवसंवादच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.
ते पुढे म्हणाले कि, आम्हाला राजकारण जमलं नाही, आम्ही राजकीय लोक नाही, स्वतःच्या आमदारांवर लक्ष ठेवलं नाही, आमच ब्रीदवाक्य 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केलं आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक क्षण लोकांचा सेवेसाठी दिला आहे. शिवसेनेचे पक्षाचा आदेश सर्वोच्च असत. शिवसनेंतील सर्वाना हवं ते दिल. काय कमी दिल यांना, एवढा आमचा द्वेष का? आमचं काय चुकलं, उद्धव ठाकरेंचे काय चुकलं असे प्रश्न यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले.
सुहास कांदेवर टीकास्त्र
शिवसंवाद यात्रेत उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? असा सवाल केला. यावर मनमाडच्या शिवसैनिकांनी नाही शब्दात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दारी का केली याच उत्तर द्या, गद्दाराला उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध नाही, मविआ सरकारने अडीच वर्ष उत्तम काम केलं. उद्धव ठाकरेंच्या कामाची देशाने दखल घेतली.. सगळं देऊनही यांची नाराजी कशासाठी? याचबरोबर चांगला मुख्यमंत्री असताना बंडखोरांनी असं का केलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. तर गद्दारांना प्रश्न विचारायचे नसतात, असे म्हणत सुहास कांदेवर टीकास्त्र सोडले.
हे तात्पुरतं सरकार ...
आदित्य ठाकरे म्हणाले कि, हे अल्पायुषी सरकार, तात्पुरत सरकार, लवकरच कोसळणार, नजेरला नजर मिळू शकत नव्हते, माझ्या चेहऱ्यावर आज स्वाभिमान, अभिमान आहे कारण मी विकलो गेलो नाही, सत्य बोला, गुंडगिरी चा काळ गेला, गुंडगिरी सोडा, समाजसेवा करा, लोकांची सेवा करा, लोक तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचतील, मात्र अशा पद्धतीने लोकांना फसवत राहिलात, वागत राहिलात तर हेच लोक तुम्हाला गाडतील, शिवसैनिकांचा आवाज बुलंद होईल, अशी विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
नव्या महाराष्ट्रासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे
राजकारणात देखील चांगल्या लोकांना स्थान असत, आम्ही लोकांची सेवा करत राहिलो, लोकांची विचारपूस करत राहिलो, मात्र इकडे आमच्याच माणसांनी आमच्याशी गद्दारी केली. यामुळे आज तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. शिवसंवाद यात्रेदरम्यान एक आजी भेटल्या. त्यांनी सांगितलं कि आता मग हटायचं नाही, ' माझा विश्वास माझा उद्धव' हे सर्वांपर्यंत पोहचवायचं, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बांधणीसाठी रस्त्यावर उतरायचं. यासाठी तुमच्या सगळ्याची साथ हवी आहे. नवा महारष्ट्र घडविण्यासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असुद्या असे आवाहन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी केले.