Nashik Manmad News : धक्कादायक! पाच महिन्याच्या मुलीला मनोरुग्ण आईकडून मारहाण, चिमुकली जखमी; मनमाड येथील घटना
Nashik Manmad News : मनमाड शहरात मनोरूग्ण आईने आपल्याच पाच महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
Nashik Manmad News : काही महिन्यापूर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील मनोरुग्णाचा आपली आईवडिलांना मारहाण करतानाच व्हिडीओ समोर आला होता. यात एक मनोरुग्ण तरुण आपल्या आईवडिलांना मारहाण करत असल्याचे दिसत होते. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड शहरात समोर आला आहे. मात्र यात मनोरूग्ण आईने आपल्याच पाच महिन्यांच्या चिमुकलीला बेदम मारहाण केल्याने चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील एका मनोरुग्ण मुलाने आपल्या आईवडील काठीने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलं होता. दुर्दैवाने या घटनेत आईचा मृत्यू तर वडील कोमात गेल्याची घटना घडली होती. हा व्हिडीओ चांगलंच व्हायरल झाला होता. आता मनमाड (Manmad) शहरातील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका मनोरुग्ण महिलेने (Psychotic Mother) आपल्याच पोटच्या पाच महिन्यांच्या मुलीला मारहाण केल्याचे समोर आले आहे. दरम्यान यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांना ही घटना कळताच त्यांनी तात्काळ त्या मुलीची सुटका करून जखमी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान एक महिला तिच्या जवळ असलेल्या पाच महिन्याच्या लहान मुलाला बेदम मारहाण करीत असल्याने मुलगी जोरजोरात रडत होती. परिसरातील नागरिकांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांना कळवले. घटनास्थळी जाऊन महिलेची चौकशी केली असता ती उत्तर भारतीय असल्यामुळे तिची भाषा समजत नव्हती. तिच्या बोलण्यावरून ही मुलगी याच महिलेची आहे की पळवून आणली आहे. याचा उलगडा होत नसल्याने कटारे यांनी त्या मुलीला तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले असून तिच्या अंगावर गंभीर जखमा असल्यामुळे तिला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर संबधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासअंती ही महिला मनोरुग्ण असल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करीत आहे.
मूळची तेलंगणातील रहिवासी
दरम्यान महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महिला बोलत असलेल्या भाषिक याला बोलवण्यात आले. यावेळी महिला उडवा उडवीची उत्तर देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिचे नाव लक्ष्मी मलया गंगवा असल्याचे समोर आले. त्याचबरोबर ती तेलंगणा राज्यातील माहूर येथील रहिवासी असल्याचे समजले तिच्या कुटुंबीयांची संपर्क केला असता ती मनोरुग्ण स्वरूपाची असून नवऱ्याने सोडून दिल्यामुळे ती आपल्या आई-वडिलांकडे राहते. मात्र आज तिच्याच एका लहान मुलीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे पाच महिन्याच्या मुलीचा जीव वाचला आहे.