TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील नाशिकच्या 39 विद्यार्थ्यांची यादी जाहीर, वेतनासह संपादणूक रद्द
TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षेतून (TET Exam) बोगस प्रमाणपत्र मिळवलेल्या नाशिकमधील (Nashik) 39 विद्यार्थ्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
TET Exam Scam : राज्यभर टीईटी घोटाळा (TET Exam Scam) चांगलाच गाजत असून यामध्ये नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील बोगस प्रमाणपत्र (Fraud Certificate) असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता नाशिकमधील समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांत राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) टीईटी टप्प्याटप्प्याने मोठी घोटाळा उघडकीस आला. याचे धागेदोरे राज्यातील मोठमोठ्या शहरांत आढळून आले. जवळपास परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवार बोगस प्रमाणपत्र धारक म्हणून आढळून आले. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
दरम्यान या टीईटी घोटाळ्यात बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 39 शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले असून या बोगस शिक्षकांची यादी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. त्यानंतर चौकशीनंतर राज्यभरात सुमारे 7 हजार 800 शिक्षकांना बोगस टीईटी प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या बोगस प्रमाणपत्र धारकांमध्ये नाशिकमधील 39 शिक्षकांचा समावेश असून त्यांची संपादनूक रद्द करण्यात आली आहे.
नाशिकचे 39 बोगस शिक्षक
राज्यभरात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात नाशिकमधील 37 शिक्षक आणि दोन लिपिक असून माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने या शिक्षकांचे वेतन बंद करण्यात आले आहे. वेतन बंद करण्यात आले असून या बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. यात 27 पुरुष व 12 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या (Pune Cyber Police) तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे.